E-Paper

बैल बाजार रोडवरील गॅस पाईपलाईनचे काम सुरू

रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा

बैल बाजार रोडवरील गॅस पाईपलाईनचे काम सुरू

रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा

कराड प्रतिनिधी : – याबाबत अधिक माहिती अशी की कराड नगरपालिका प्रभाग क्रमांक १४ मधील बैल बाजार रोड परिसरात गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली. या कामाची पाहणी सामाजिक कार्यकर्ते सतीश भोंगाळे व इंद्रजीत भोपते यांनी केली.

गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर बैल बाजार रोडच्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा असून, गेल्या काही काळापासून या रस्त्यामुळे नागरिकांना होत असलेली गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

या कामासाठी लवकरात लवकर दखल घेऊन काम चालू करून घेतल्या बद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. राजेंद्रसिंह यादव बाबा, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष व नगरसेवक मा. जयंतकाका पाटील तसेच उपनगराध्यक्ष मा. प्रतापराव साळुंखे यांचे सामाजिक कार्यकर्ते सतीश भोंगाळे व इंद्रजीत भोपते यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे कामही तातडीने मार्गी लागावे, अशी परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇 येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!