भारतीय बौध्द महासभेच्या वतीने खराडे ता.कराड वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न
वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न

भारतीय बौध्द महासभेच्या वतीने खराडे ता.कराड वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न
कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, भारतीय बौध्द महासभा तथा दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने खराडे तालुका कराड येथे रविवारी वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सूरज किरतवडे यांनी करून वर्षावास कार्यक्रमाचे प्रवचनकार नंदकुमार भोळे, साहेबराव लोखंडे व मधूकर सागरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी नंदकुमार भोळे यांनी बौद्ध धम्म व विज्ञान, बौद्ध धम्म व मानवता या विषयावर प्रवचन दिले. तसेच मधूकर सागरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील योगदान व माता रमाईचा त्याग या विषयावर व बौद्धांची प्रर्यटन स्थळे याची माहिती दिली.
साहेबराव लोखंडे यांनी घर तिथे समता सैनिक व गाव तिथे ग्राम शाखा सुरू सुरू करण्याचे आवाहन केले.
एकता मित्र मंडळ,खराडे यांच्या वतीने सर्व उपासक उपासिका यांना भोजनदान दिले.
शेवटी सूरज किरतवडे यांनी सर्व प्रवचनकार उपासक उपासिका बालक बालिका व एकता मित्र मंडळ यांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज किरतवडे, किशोर किरतवडे सोन्या किरतवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.





