महाराष्ट्र

Amit Thackeray : ‘राजसाहेब मुख्यमंत्री होवोत’, अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?

 

Amit Thackeray : रविवार आणि सुट्टीचा दिवस असल्याने पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

पुणे: रविवार आणि सुट्टीचा दिवस असल्याने पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्याचे लाडके दैवत मानल्या जाणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी रांगा लावल्या आहेत. केवळ पुण्यातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातून आणि इतर राज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी आणि विविध मंडळांचे देखावे पाहण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. ‘प्रेम मंदिरा’ची भव्य प्रतिकृती आणि रोषणाई यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून वृंदावन येथील प्रसिद्ध ‘प्रेम मंदिरा’ची १३५ फूट उंच अशी भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हे पुण्यातील सर्वात उंच मंदिर ठरले असून, आकर्षक रोषणाईने देखावा उजळून निघाला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्य मंदिराबाहेर सुमारे ५०० मीटरपर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आज मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील पुणे दौऱ्यावरती आहेत, त्यांनी देखील अनेक मंडळांना भेटी दिल्या.

Amit Thackeray : हे लोकांचे प्रेम आहे आणि मी नशीबवान आहे

दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray)  यांनीही पुण्यात विविध गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. डोक्यावर पारंपरिक फेटा बांधून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. जुन्या काळात जसा गणेशोत्सव साजरा व्हायचा, तसाच पुन्हा मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय, असा आनंद त्यांनी व्यक्त केला. तसेच, डीजे ऐवजी ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांचीच आपल्याला आवड असल्याचे त्यांनी सांगितले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आणि तरुणांनी अमित ठाकरे (Amit Thackeray)  यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. “हे लोकांचे प्रेम आहे आणि मी नशीबवान आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी एबीपी माझाशी बोलताना दिली.

Amit Thackeray : राज साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे

शेतकऱ्यांच्या आणि दुष्काळाच्या प्रश्नांवर बोलताना अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले की, “मी फक्त मंदिरात येऊनच नाही, तर ३६५ दिवस देवाकडे प्रार्थना करत असतो. पण केवळ प्रार्थना करण्यापेक्षा मैदानात उतरून लोकांचे प्रश्न सोडवणे मला अधिक महत्त्वाचे वाटते. देवाचं माझं एक वेगळं नातं आहे, तर यावेळी राज ठाकरेंसाठी काय प्रार्थना केली असे विचारले असता, “राज साहेबांनी (Raj Thackeray) राज्याचे मुख्यमंत्री व्हावे,” अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!