
सौ. इंदुताई थोरात यांचे निधन
कराड/प्रतिनिधी – कालवडे (ता. कराड) येथील सौ. इंदुताई रामचंद्र थोरात (वय ७०) यांचे सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी निधन झाले. दैनिक पुण्यनगरी चे वाठार प्रतिनिधी राजेंद्र थोरात यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कालवडे तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रक्षाविसर्जन विधी बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता कालवडे येथे होणार आहे.





