E-Paper

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा चुकीचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न झाल्यास बंधूत्व परिषद उधळून लावणार — प्रा.सुकुमार कांबळे यांचा समता परिषदेत इशारा 

समता परिषद 2026

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा चुकीचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न झाल्यास बंधूत्व परिषद उधळून लावणार — प्रा.सुकुमार कांबळे यांचा समता परिषदेत इशारा 

कराड प्रतिनिधी — याबाबत  अधिक माहिती अशी की, कराड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित लोककल्याण मंडळ यांच्या वतीने मागील वर्षी पासून बंधूत्व परिषद भरवून इथल्या बहुजन समाजातील लोकांना चूकीची माहिती देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा चुकीचा संदेश देऊन बहुजनांच्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेली बंधूत्व परिषद ही विश्वासघातकी असून जर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जर खरोखरच जर संघाच्या शाखेला भेट द्यायला आले असतील तर त्याचे पुरावे द्या अन्यथा पुढील वर्षी होणारी बंधूत्व परिषद उधळली जाणार असा स्पष्ट इशारा आज झालेल्या समता परिषदेच्या कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केली.

भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनी समता सामाजिक विकास संस्थेच्या वतीने समता परिषद 2026 चे आयोजन केले होते 

यावेळी बोलताना प्रा. सुकुमार कांबळे यांनी संघ व भाजप यांच्या मनूवादी विचारांचा पर्दाफाश केला. त्यांनी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचा विचार मांडला. देशात मनूवादी विचारांचं व महाराष्ट्रत त्याच विचारांचं सरकार असताना शैक्षणिक संस्था व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी आजची परिस्थिती काय आहे याचाही विचार इथल्या एसी एसटी ओबीसी व मायनारिटिज समाजातील लोकांनी विचार करणं गरजेचं आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले. एक तासाच्या भाषणात प्रा.सुकमार कांबळे यांनी ब्राह्मणी व्यवस्थेवर प्रहार करून बहुजन समाजाला एकीचं बळ निर्माण करण्यासाठी व एकसंध होण्याचं आवाहन केले. 

समता सामाजिक विकास संस्था च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. 

यावेळी मा.जेष्ठ पत्रकार विजय मांडके, जेष्ठ विधिज्ञ ऍड संभाजी राव मोहिते, यांचेही यावेळी भाषण झाले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनी केले.तर या कार्यक्रमास फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!