शांत संयमी व्यक्तीमत्व याचे प्रतिबिंब म्हणून सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट..
कराड

शांत संयमी व्यक्तीमत्व याचे प्रतिबिंब म्हणून सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट..
कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्हा सोलापूर येथील एक युवक दोन अडीचशे किलोमीटरवर वर असलेल्या कराड शहरात येऊन वयाच्या बावीस तेवीस वर्षात रुग्ण सेवेचा वसा घेऊन ज्यांनी कराडच्या कूष्णा चारिटेबल येथे अधिपरिचारक म्हणजेच ब्रदर म्हणून रुग्ण सेवेत प्रारंभ केला. ते म्हणजे श्री. भुजंग शेकाप्पा जेटीथोर त्यांनी आपल्या तेहतीस वर्ष तीन महिने या कालावधीत विविध प्रकारच्या सेवा देत देत ते सेवा निवृत्त होईपर्यंत ते त्या विभागातील इन्चार्ज झाले आणि शेवटी त्यांना वयोमानानुसार त्यांना सेवा निवृत्त व्हावे लागले. त्यांची कौटुंबिक परिस्थिती पाहता त्यांची पत्नी सुध्दा या कराडच्या स्व.सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात अधिपरिचारिका ते रुग्णालयाच्या सर्व विभागातील इन्चार्ज म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. याची प्रचिती म्हणून सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त कराड उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या वतीने शांत संयमी व्यक्तीमत्व असणारे श्री. भुजंग शेकाप्पा जेटीथोर यांना या निमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. या वेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका सौ. मंगल जानकर, सहाय्यक परिसेविका सौ. रेखा यादव, यांच्या सोबत सर्व नर्सिंग स्टाफ व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. श्री. जेटीथोर यांच्या सेवा पूर्ती कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक दिल्या.शेवटी उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक परिसेविका सौ. सुवर्णा जेटीथोर व भुजंग शेकाप्पा जेटीथोर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

