E-Paper

एक पक्ष एक नेता आणि एकच झेंडा या त्रिसूत्री वर निवडणूक लढवा

बसपा चे किरण थोरवडे यांचे संवाद बैठकीत आवाहन

एक पक्ष एक नेता आणि एकच झेंडा या त्रिसूत्री वर निवडणूक लढवा 

बसपा चे किरण थोरवडे यांचे संवाद बैठकीत आवाहन 

कराड प्रतिनिधी — याबाबत अधिक माहिती अशी की, कराड नगरपरिषद व मलकापूर नगरपंचायत निवडणुकीत बाबत विचार विनिमय करण्यासाठी हॉटेल कृष्णा पॅलेस कराड येथे सम विचारी कार्यकर्ताची संवाद बैठक आयोजित केली होती.

यावेळी बोलताना बहुजन समाज पार्टी चे माजी शहराध्यक्ष किरण थोरवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी नगरपरिषदेची निवडणुक लढविण्यासाठी शहरातील विविध राजकीय पक्ष व प्रस्थापित आघाड्या या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना डावलून इतरांना उमेदवारी देतात परंतु चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे जर निवडणूका लढवायच्याच असतील तर एक पक्ष एक नेता आणि एकच झेंडा या त्रिसूत्री बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या चिन्हावर निवडणूक लढवा असे जाहीर आवाहन श्री. किरण थोरवडे यांनी केले.

या संवाद बैठकीत भिमशक्ति सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे,आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲड.धीरज जाधव,नवाज सुतार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कराड दक्षिण अध्यक्ष मुकुंदराव माने श्रीकांत वाघमारे, अशोक भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले.

या बैठकीस शहरातील समविचारी पक्षांचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचलन दत्तात्रय दुपटे यांनी केले तर आनंदराव लादे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!