केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ बाबत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ बाबत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रतिक्रिया
देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री ना. निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था यांना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थसंकल्प असून, यातून विकसित भारताच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळण्यास बळ मिळणार आहे.
या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी विशेष महत्त्वाच्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी वसतिगृह उभारणीसाठी करण्यात आलेली तरतूद ही मुलींच्या शिक्षणाला बळ देणारी आहे
तसेच रस्ते आणि महामार्ग विकासासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून देशातील दळणवळण अधिक सक्षम करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शेती आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या तरतुदीदेखील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या आहेत. ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प हा ग्रामीण भागातील अर्थचक्र मजबूत करणारा आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि युवक यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असून देशाच्या विकासाला नवी दिशा देणारा आहे.




