E-Paper

डॉ.आंबेडकर जयंती उत्सवास सहकार्य करणार  :- नगराध्यक्ष श्री.राजेंद्रसिंह यादव यांची ग्वाही 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ.आंबेडकर जयंती उत्सवास सहकार्य करणार  :-नगराध्यक्ष श्री.राजेंद्रसिंह यादव यांची ग्वाही  

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरात येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते त्या जयंती उत्सवास नगर परिषद व यशवंत विकास आघाडीच्या वतीने सहकार्य करणार असल्याची ग्वाही कराड नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मलकापूर नगरपंचायत चे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.तेजस सोनावणे, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष नगरसेवक जयंत पाटील, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, फारुख पटवेकर, बांधकाम समितीचे सभापती अख्तर आंबेकरी, नगरसेवक गणेश पवार, आशुतोष डुबल,अजय पावसकर, विजयसिंह यादव, नरेंद्र लिंबे, शांताराम थोरवडे, आप्पासाहेब गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.यादव म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आत्मसात करून जयंती साजरी केली पाहिजे.

यावेळी मलकापूर नगरपंचायत चे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.तेजस सोनावले व फारुख पटवेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष श्री.राजेंद्रसिंह यादव व श्री.तेजस सोनावले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक श्री.राहुल भोसले यांनी नगराध्यक्ष श्री.राजेंद्रसिंह यादव यांचा शाल श्रीफळ व संविधान प्रस्थाविक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांना श्रीफळ गुलाब पुष्प व संविधान प्रस्थाविक देऊन कमेटीच्या पदाधिकारी यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण थोरवडे यांनी केले तर प्रास्ताविक दत्तात्रय दुपटे यांनी केले शेवटी आप्पासाहेब गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!