डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिस प्रशासनाचे बैठकीचे आयोजन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिस प्रशासनाचे बैठकीचे आयोजन
कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, येत्या १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराड शहर व ग्रामीण भागातील सर्व बौध्द बांधव व आंबेडकरी प्रेमी कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड येथे आयोजित केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून सर्व जयंती उत्सव कमेटीच्या पदाधिकारी व विविध पक्ष संघटना यांना देण्यात आली आहे. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न होणार आहे. तरी कराड शहरातील बौद्ध बांधव व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक राहुल भोसले यांनी केले.
या बैठकीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती, मिरवणुका कशा पद्धतीने काढल्या पाहिजेत आणि कायदा सुव्यवस्था अबाधित कशी राहील यावर प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. तरी सर्व कराड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.





