डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करताना उपस्थितांच्या अंगावर शहारे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करताना उपस्थितांच्या अंगावर शहारे.
कराड प्रतिनिधी : — भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजच्या पाचव्या दिवशी हिंदूतेज शिवकालीन दांडपट्टा ग्रुप,जखिणवाडी तालुका कराड येथील येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दांडपट्टा आणि थरारक याची जाणीव करून देण्यासाठी व छ.शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये कुणी अन्याय सहन करता कामा नये. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व लढाईत कोण कोण ते शस्र वापरता येईल आणि कुणाला पराजित करता येईल. याची प्राथमिक रित्या हा सर्व प्रकार व त्यांनी केलेल्या विषयावर जखिणवाडी तालुका कराड येथील हिंदू तेज शिवकालीन दांडपट्टा ग्रुप यांच्या ग्रुप मध्ये वयाच्या पाच वर्षांपासून ते वीस वर्षांपर्यंतचे युवा युवक यांनी चित्तथरारक कसरती करून उपस्थितांच्या काळजाचा ठेका चुकवला. दांडपट्टा हा कार्यक्रम हा एखाद्यावर जीवघेण्या सुध्दा असू शकतो पण आजच्या कलाकारांनी कुणालाही इजा अथवा जखमी न करता अत्यंत ज्वालाग्राही पदार्थ याचा वापर करून विविध शस्त्रे व प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी उपस्थितांनी या सर्व ग्रुप चे कौतुक केले व जयंती उत्सव कमेटीच्या वतीने त्यांचे आभार मानले.
व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇 येथे क्लिक करा




