E-Paper

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले अनिल घराळ (बापू ) भाजपा च्या वाटेवर 

शिवसेनेमध्ये योग्य स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी  

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले अनिल घराळ (बापू ) भाजपा च्या वाटेवर 

 शिवसेनेमध्ये योग्य स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी  

कराड प्रतिनिधी :-  बळीराजाच्या हक्कांसाठी लढणारा बुलंद आवाज म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ बापू ओळखले जातात , 

शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे  मात्र, निसर्गाची अवकृपा, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भावाची अनिश्चितता यांमुळे शेतकरी नेहमीच संकटात सापडतो , अशा बिकट परिस्थितीत, लाखो शेतकऱ्यांच्या व्यथा थेट शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देणारे शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल घराळ बापू म्हणजे बळीराजासाठी एक मोठा आधारस्तंभ 

समस्यांचा सखोल अभ्यास आणि बुलंद नेतृत्व

जमिनीवर राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाची जाणीव असणारा एक सच्चा मार्गदर्शक स्थानिक शेती, सिंचन, खते-बियाणे आणि शेतीमालाच्या भावासंदर्भातील समस्यांचा ते सखोल अभ्यास करतात 

संघर्ष आणि शासन दरबारी पाठपुरावा

शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे, कर्जमुक्ती, आणि पीकविम्यासारख्या गंभीर प्रश्नांवर अनिल घराळ बापू यांनी आजवर विविध आंदोलने आणि निदर्शने केलेली आहेत लाखो शेतकऱ्यांना एकत्र करून प्रशासनावर दबाव आणणे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडणे हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे 

शेतकऱ्यांना कायदेशीर व तांत्रिक आधार

आजच्या डिजिटल युगात शेतकरी बांधवांना नवनवीन सरकारी योजना, ई-पीक पाहणी किंवा अनुदानाबाबत अचूक माहिती मिळणे गरजेचे असते, जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून अनिल घराळ बापू व कार्यकर्ते तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवतात,

बळीराजाचा खरा साथीदार

गावपातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते थेट मंत्रालयापर्यंतच्या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे कठीण काम शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ बापू करतात , जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट येते, तेव्हा राजकीय मतभेद विसरून शेतकरी हितासाठी रस्त्यावर उतरणारा हा नेता खऱ्या अर्थाने लाखो शेतकऱ्यांच्या वेदनेचा ‘आवाज’ आणि आशेचा किरण आहे 

नुसता सातारा जिल्हा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडून ऐकावयास मिळणारे नाव म्हणजे अनिल घराळ बापू यांनी शेतकरी हितासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहासत्व व कराड नगरीचे युवा नेते राजेंद्रसिंह यादव बाबा यांच्या शब्दाखातीर नुकत्याच झालेल्या कराड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता ,

दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनेक महिने उलटून गेल्यानंतर देखील आपल्या सच्चा नेत्याला लाखो शेतकऱ्यांच्या कैवाऱ्याला शिवसेनेमध्ये योग्य स्थान मिळणे अथवा एखाद्या महत्त्वाच्या महामंडळासारख्या पदाची जबाबदारी देणे कार्यकर्त्यांना अपेक्षित होते परंतु असे काही होताना दिसून येत नसल्याने

गेले महिनाभर झाले अनिल घराळ बापू यांना कार्यकर्त्यांकडून इतर राष्ट्रीय पक्षांमध्ये प्रवेश करण्याच्या बाबतीमध्ये विनंती करण्यात येत असून त्या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असता

भाजपाच्या एका बड्या नेत्याकडून अनिल घराळ बाबू यांना भाजपा प्रवेशाबद्दल ऑफर देखील आल्याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात सुरू असून याबाबत अनिल घराळ बापू व भाजपाच्या त्या बड्या नेत्याची बंद कमरेत चर्चा देखील झाल्याचे ऐकावयास मिळत आहे , आज माय मराठी टीव्ही ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते या विषयावरती किती गांभीर्याने लक्ष देतात की वेळ निघून गेल्यानंतर लक्ष दिले जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे  !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!