E-Paper

उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका दिवस उत्साहात साजरा 

परिचारिकांचे केले कौतुक 

उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका दिवस उत्साहात साजरा  परिचारिकांचे केले कौतुक 

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. 

कराड येथील स्व.सौ.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका दिवस अत्यंत आनंदाने व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सौ.सुनिला लाळे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिपरीचारिका व परिसेविका यांचे विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना डॉ. लाळे मॅडम यांनी हा दिवस संपूर्ण जगभरात परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो तसाच आपल्या उपजिल्हा रुग्णालयात सुध्दा हा दिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो याचा विशेष आनंद होत आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सेवा करणं हे माझ्या परिचारिका करतायत याचे समाधान रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्या कडून ऐकावयास मिळत आहे. म्हणून मी सर्व परिचारिकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे गौरवोद्गार डॉ लाळे मॅडम यांनी केले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या सहायक अधिसेविका सौ.मंगल जानकर यांची डॉ. सुनिला लाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

यावेळी सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक श्री.आदेश कांबळे,परिसेविका सौ. सुवर्णा जेटीथोर,सौ. रेखा यादव,सायरा शेख,अधिपरिचारिका मधू पवार, ज्योती ढाले, मनिषा वीर, भाग्यश्री गुरव, संगिता कांबळे,भोपते, धनावडे, कुंभार, पाटील,पारखे,यासह ब्रदर श्री. सोहेल मुल्ला, मिलिंद साठे,सागर व इतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.शेवटी सुवर्णा जेटीथोर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!