E-Paper

आंदोलन नेमके कशासाठी ?

अधिकाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी का अवैध व्यवसायिकांवर आपली वचक जमवण्यासाठी ? 

आंदोलन नेमके कशासाठी ?

अधिकाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी का अवैध व्यवसायिकांवर आपली वचक जमवण्यासाठी ? 

याबाबत अधिक माहिती अशी की तहसीलदार कार्यालयासमोर प्रशासकीय इमारती समोर अनेक जण आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करत बसलेले आपण पाहिलेच आहे , आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, कोण बेमुदत धरणे आंदोलन करते तर कोण आमरण उपोषण करते

परंतु काही वेळेला आंदोलनकर्त्यांच्या हालचालीवरून अशी शंका उपस्थित होते की , काही संघटनांच्या नावावरती आंदोलन करायचे , ज्या कारणासाठी आंदोलनाला बसायचे ते कारण राहते बाजूलाच , मात्र अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार काही वेळेला पहावयास मिळत आहे , तर काही वेळेला असा प्रश्न पडतो की यांचे जे आंदोलन आहे हे जर अवैध व्यवसायाच्या विरोधामध्ये असेल तर आत्तापर्यंत किती अवैध व्यवसाय बंद झाले,

हे सांगण्या पाठीमागचे उद्दिष्ट असे की सर्वच आंदोलनकर्ते एक सारखे नसतात काही आंदोलनकर्ते प्रामाणिकपणे न्याय हक्कासाठी आंदोलन करतात तर काही आंदोलनकर्त्यांचे उद्दिष्ट मात्र वेगळेच दिसून येते ,

नुकतेच विकास लोंढे नामक एका व्यक्तीने एका संघटनेचा सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन दिले होते की कराड शहरासह तालुक्यातील केमिकल युक्त ताडी विक्री अवैधरित्या सुरू असलेली दारूची विक्री ताबडतोब बंद व्हावी अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार ,

त्याप्रमाणे लोंढे साहेबांनी तहसीलदार कार्यालयासमोर मंडप टाकला भला मोठा फ्लेक्स बोर्ड लावला फ्लेक्स बोर्ड वरती मुद्दे झळकले ,शहरासह तालुक्यामध्ये अवैधरित्या सुरू असलेली केमिकल युक्त ताडी विक्री तसेच अवैधरित्या सुरू असलेली दारूची विक्री कायमस्वरूपी बंद व्हावी अशा आशयाचा मजकूर लिहित आपल्या संघटनेच्या संस्थापकांचा फोटो महापुरुषांचा फोटो आपण स्वतः उपजिल्हाध्यक्ष असल्याचा फोटो लावत तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसले .

ज्या दिवशी आंदोलनात बसले त्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे अधिकारी उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध ताडी व दारू व्यवसायिकांवर केलेल्या कारवायाच्या माहितीचे पत्र घेऊन तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलन स्थळी विकास लोंढे यांना भेटण्यास आले त्यांना ते पत्र वाचून दाखवले परंतु त्या दिवशी विकास लोंढे यांचे समाधान झाले नाही विकास लोंढे यांची मागणी अशी होती की कायमस्वरूपी हे केमिकल युक्त ताडी विक्रीचे व्यवसाय अवैध दारू विक्रीचे व्यवसाय बंद झाले पाहिजेत त्याशिवाय मी मागे हटणार नाही , त्यामुळे त्यांनी ते पत्र नाकारले,

त्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की शहरातील शाहू चौकामध्ये शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या हाकेच्या अंतरावरती बनावट केमिकल युक्त ताडी-विक्रीचा व्यवसाय सुरू आहे त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या अवैधताडी विक्रेत्याच्या अड्ड्यावर जाऊन किमान शंभरहून अधिक ताडीच्या पिशव्या नष्ट केल्या तसेच ताडी विक्रेता मालक चैतन्य पवार याच्यावरती कारवाई देखील केली ,

त्यानंतर सलग शासकीय तीन सुट्ट्या पण गंमत अशी की याच शासकीय सुट्ट्यांचा गैरफायदा घेत शहरासह तालुक्यामध्ये  व्यवसाय सुरुच होते, आज देखील केमिकल युक्त ताडीच काय तर अवैधरित्या दारूची विक्री देखील सुरू आहे आणि आहे त्याच ठिकाणी, मग आपण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा पोलीस प्रशासनाला दोषी मानायचे का ? 

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्यांना दिलेल्या अधिकारानुसार त्या त्या ठिकाणी जाऊन कारवाई करणे व्यतिरिक्त काहीच करू शकत नाहीत

ते फार तर वरिष्ठांना प्रस्ताव पाठवू शकतात की त्याच ठिकाणी सदरची व्यक्ती वारंवार तेच तेच कृत्य करत आहे त्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी

मग उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आपले काम करत असताना आंदोलनकर्ते विकास लोंढे असोत किंवा अन्य कोणी यांचे समाधान नेमके कशामध्ये होते म्हणून ते अचानकपणे आंदोलन पाठीमागे घेतात

आणि अगोदर ठरवल्यासारखे राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र तयार करून आणायला सांगतात तसेच काही वेळेला पोलीस प्रशासनाला देखील पत्र तयार करून आणायला सांगतात त्यामध्ये मजकूर काय असतो की आम्ही आतापर्यंत एवढ्या कारवाया केल्या आणि इथून पुढे देखील कारवायांमध्ये सातत्य राहील आणि खरेच अधिकारी किंवा कर्मचारी आपले काम आपल्याला दिलेल्या नियमानुसार अधिकारानुसार करतच असतो

मग प्रश्न असा पडतो की आंदोलन कर्त्याचे नेमके उद्दिष्ट काय आहे ? अधिकाऱ्यांना वेठीस धरायचे की अवैध व्यवसायिकांवर आपली वचक जमवायची ,

त्यामुळे आता सुज्ञ नागरिकांनो आपण ही जागे व्हा आपल्याला जर कधी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा बोर्ड दिसला किंवा कोणी उपोषणकर्ता दिसला तर भावनिक होऊन जाऊ नका आंदोलन कर्त्याचा उपोषणकर्त्याचा मूळचा उद्दिष्ट जाणून घ्या आणि मगच त्याला पाठिंबा द्या अथवा त्याकडे लक्ष द्या,

कारण हेच आंदोलन करते उपोषण करते प्रसिद्धी माध्यमांचा देखील वापर करू लागले आहेत आणि तेही गरजेपुरता त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांनीही कोणत्याही प्रकारचे आंदोलन सुरू असल्यास त्याचे उद्दिष्ट जाणून घ्या आणि मगच त्याच्या बातमीला प्रसिद्धी द्यावी ,

तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या निवेदनावर लक्ष केंद्रित न करता आपणास दिलेल्या अधिकारांचा वापर करून काम करत रहा , एखादा आंदोलनकर्ता जर का तुम्हाला कर्तव्य बजावत असताना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल तर , वरिष्ठांना याची माहिती द्या , तसेच प्रसिद्धी माध्यमांसमोर देखील आपल्या भावना व्यक्त करा ,

जाता जाता माय मराठी टीव्ही चा पुन्हा एकदा विकास लोंढे यांना सवाल आहे की तुमचे नेमके समाधान कशावर झाले ? तुमचा आंदोलन करण्या पाठीमागचा नेमका उद्दिष्ट काय होता ? खरंच शहरासह तालुक्यातील अवैध ताडी विक्री दारू विक्री कायमस्वरूपी तुमच्या म्हणण्याप्रमाणे बंद झाली का ? कारण तुमच्या मागण्या ह्याच होत्या ना ? यापैकी तुमच्या किती मागण्या मान्य झाल्या ? आणि तुम्ही आंदोलन पाठीमागे घेण्या पाठीमागचे कारण काय ? या सर्व गोष्टींचा उलगडा प्रसिद्धी माध्यमांसमोर करा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!