E-Paper

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कराड येथे ९ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन — जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले यांची माहिती 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कराड येथे ९ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन — जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले यांची माहिती 

कराड प्रतिनिधी : — या बाबत अधिक माहिती अशी की, अवघ्या काही दिवसांवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून संपूर्ण देशभरात भिमसैनिकांना याची उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच कराड शहरातील भिमसैनिक सुद्धा जयंती उत्सवाच्या कामात व्यस्त आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटी, कराड यांच्या वतीने गुरुवार दिनांक ९ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक श्री.राहुल भोसले व उपाध्यक्ष श्री.सुदेश थोरवडे यांनी दिली.

गुरुवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.तसेच सकाळी ११ वाजता नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.दिनांक १० एप्रिल सकाळी ११ ते ४ पर्यंत भव्य रक्तदान शिबीर व रक्तदात्यास भेट वस्तू दिली जाणार आहे.व सायंकाळी ७.३० वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असून त्यानंतर क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने फुले नगर येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.तसेच सकाळी ११.३० वाजता आरोग्य शिबीर व सायंकाळी ७.३० वाजता अंधश्रध्दा निर्मूलनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.

दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मा.प्रदीप बनसोडे यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. तर रात्री ८ वाजता भीम गितांचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दांडपट्टा तर रात्री ११.५९ मिनिटांनी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती उत्सव कमेटीच्या वतीने व बौध्द समाज तसेच महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे. व तदनंतर पारंपारिक पध्दतीने भजन गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ तेलचित्रांचे प्रदर्शन व दुपारी ३ वाजता मानाचा घोड्याच्या लिलाव होऊन सायंकाळी ५ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक विविध वाद्यांचा व चित्ररथांच्या सहभागाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा फुले चौक एसटी स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दत्त चौक ते आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा ते स्व.पी.डी.पाटील साहेब यांच्या घरापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यत मिरवणूक निघणार आहे.तसेच दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता भव्य डान्स स्पर्धेचेही आयोजन केले आहे. तरी दिनांक ९ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत आयोजित केलेल्या कार्यक्रमास कराड शहरातील व उपनगरातील सर्व बहुजन बांधवांनी सहभागी होऊन जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!