E-Paper

1 मे महाराष्ट्र दिन ड्राय डे मात्र कराड शहर व परिसरातील अवैध दारू विक्री ताडी-विक्री जोमाने सुरू….

ड्राय डे दिवशी अवैध दारू विक्री ताडी-विक्री जोमाने सुरू....

1 मे महाराष्ट्र दिन ड्राय डे मात्र कराड शहर व परिसरातील अवैध दारू विक्री ताडी-विक्री जोमाने सुरू….

कराड प्रतिनिधी :-  याबाबत अधिक माहिती अशी की एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त ड्राय डे म्हणून घोषित केला जातो यावेळेस सर्व प्रकारच्या मद्य विक्रेत्यांना मद्य विक्री करण्यास मनाई केली जाते

त्या अनुषंगाने शहर व परिसरातील सर्व परवानाधारक मद्य विक्रेत्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होती परंतु या उलट कोणत्याही प्रकारचा परवाना नसलेले अवैध दारू विक्रेत्यांनी ताडी विक्रेत्यांनी मात्र कोणाचेही भय न बाळगता अगदी बिनधास्तपणे दारूची विक्री ताडीची विक्री सुरू ठेवली होती

यांना कोणत्याही प्रकारचे भय दिसून आले नाही अगदी बिनधास्तपणे कोणाचा तरी यांच्यावरती वरदहस्त असल्याप्रमाणे सर्व काही जोमाने सुरूच होते वास्तविक पाहता सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पदी आपला पदभार स्वीकारल्यानंतर श्री निखिल पिंगळे सरांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील अवैध व्यवसायिकांवर आपली वचक निर्माण करत संपूर्ण सातारा जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून सध्या तरी खुलेआम सुरू असलेले अवैध व्यवसाय 80% बंद दिसून येत आहेत तर 20 टक्के अवैध व्यवसाय अजूनही चोरी चोरी चुपके चुपके सुरूच आहेत

त्यातच भर म्हणून की काय आज ड्राय डे दिवशी देखील अवैध दारू विक्रेत्यांनी ताडी विक्रेत्यांनी मात्र जणू काही जिल्हा पोलीस प्रमुखांच्या निर्णयाला चॅलेंज केल्यासारखे कराड शहर व परिसरात आपले अवैध व्यवसाय सुरूच ठेवले होते 

वास्तविक पाहता दारू विक्री ताडी विक्री यावरती नियंत्रण ठेवण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपले लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे कराड शहरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय देखील आहे

परंतु या कार्यालयामार्फत अनेक वेळेला अवैध दारू विक्रेत्यांवरती अवैध ताडी विक्रेत्यांवरती वेळोवेळी कारवाया केल्या जातात परंतु कारवाई करून देखील पुन्हा दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थेच निर्माण होते

तसेच कराड शहर पोलीस ठाणे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून देखील अवैध दारू विक्रेत्यांवरती ताडी विक्रेत्यांवरती वेळोवेळी कारवाया केल्या जातात परंतु या अवैध ताडी विक्रेत्यांवर दारू विक्रेत्यांवरती याचा कोणताही परिणाम होताना दिसून येत नाही याउलट कारवाई झाली की दुसऱ्या दिवशी परिस्थिती आहे तशीच दिसून येते 

हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि यावरती कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांमधून तसेच विविध संघटनेच्या कडून सध्या जोर धरू लागली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!