डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद — विजेता स्पर्धकांना रेंजर सायकल बक्षिस
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद — विजेता स्पर्धकांना रेंजर सायकल बक्षिस
कराड प्रतिनिधी — भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे जयंती उत्सव कमेटीने आयोजित केलेल्या इक्वालिटी रन 2.0 मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त जयंती उत्सव कमेटीने ९ एप्रिल पासून स्वच्छता अभियानापासून जयंती उत्सवास सुरुवात केली आहे. या मध्ये नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबीर, महिलांच्या आवडीचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हे कार्यक्रम पार पडत असताना आज शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व निळा झेंडा फडकावून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली मॅरेथॉन स्पर्धा उपजिल्हा रुग्णालय ते एसटी स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दत्त चौक मार्गे आझाद चौक, कन्या शाळा ते कूष्णा नाका ते परत उपजिल्हा रुग्णालयापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा स्पर्धेचा मार्ग होता.
या स्पर्धेत विजेता ठरलेल्या विजेत्यांना पारितोषिक म्हणून रेंजर सायकल चे बक्षिस देण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आयु.प्रसन्ना भिसे व जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले यांनी विजेत्यांना बक्षिस वितरण केले.
याप्रसंगी कराड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान पाणी पुरवठा सभापती श्री. अल्ताफ भाई शिकलगार, समाज भूषण आप्पासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक शांताराम थोरवडे, जयंती उत्सव कमेटीचे उपाध्यक्ष सुदेश थोरवडे प्रभाकर थोरवडे सचिव संतोष बोलके,ओंकार थोरवडे, अभिजित थोरवडे, प्रवर्तन थोरवडे, अश्लेश थोरवडे सतिश भिसे या सह कमेटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचे सुचक निवेदन क्रीडा प्रशिक्षक श्री. सतिश भोसले यांनी केले तर शेवटी कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा 👇👇👇




