E-Paper

विज्ञान निर्भय निती आणि कुणाची भिती — मा. संजय बनसोडे 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

विज्ञान निर्भय निती आणि कुणाची भिती — मा. संजय बनसोडे 

कराड प्रतिनिधी : — या बाबत अधिक माहिती अशी की, कराड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त होत असलेल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कराड येथे आजच्या तिसऱ्या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन यावर समाजातील महिलांचे व युवकांचे भोंदू बाबा आणि समाजातील भोंदू बाबा यांच्या पासून सावध रहा.असे परखड मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. 

कराड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीने आयोजित केलेल्या ऐसे कैसे झाले भोंदू या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.

     गेल्या तीन दिवसांपासून जयंती उत्सव कमेटीच्या वतीने विविध कार्यक्रम पार पाडत आहे. परंतु आजच्या अंधश्रद्धा कि श्रद्धा, आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात ज्या भोंदू बाबा ची चर्चा आहे त्या विरोधात महाराष्ट्रातील किती हिंदुत्ववादी महिला संघटना व हिंदू संघटनांनी याला विरोध केला याची साधी विचारपूस सुद्धा इथला बुद्धीजीवी समाज करताना दिसत नाही. देशात जेव्हा शंभर भोंदू बाबा पकडले जातात त्यावेळी ऐंशी भोंदू बाबा हे हिंदू असतात. आणि वीस भोंदू बाबा हे बौध्द धर्मिय नसून ते इतर जातीचे असतात. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून फुले शाहू आंबेडकर यांच्या वैज्ञानिक विचार करून अशा जादूटोणा व हात चलाखी सारख्या घटनांना बळी पडू नका. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्र राज्यात या बुवा बाजी कर्मकांड या विरोधात गेली कित्येक वर्षे काम करत आहे. तरी सुध्दा या समितीमध्ये सक्रिय कार्यकर्ते हे पाच हजार असून सभासद हे बावीस हजार आहेत. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या पाहता सात कोटी असताना सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या चौकटीत राहून महाराष्ट्रातील बुवा बाजी कर्मकांड या पासून इथल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हि समिती कार्यरत आहे. श्री. संजय बनसोडे यांनी बौध्द धर्म व इतर धार्मिक विधी यावरूनही आपले विचार परखडपणे मत मांडले. 

जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले यांनी संजय बनसोडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक दत्तात्रय दुपटे यांनी केले. शेवटी आप्पासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!