
युवा उद्योजक श्री.शंतनु कालेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
कराड प्रतिनिधी — कराड शहरातील युवा उद्योजक तथा नामदेव समाज संस्थेचे माजी अध्यक्ष व फिटनेस स्टुडिओ चे संचालक साई लॅबोरेटरी चे प्रोमोटर श्री.शंतनु कालेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यांच्या मातोश्री सौ.सुरेखा कालेकर व त्यांच्या पत्नी सौ.मूणालीनी कालेकर यांनी त्यांचे औक्षण केले . यावेळी फिटनेस स्टुडिओ चे मार्गदर्शक माजी आमदार श्री. आनंदराव पाटील, शितल शहा, कविता पवार, यांच्यासह फिटनेस स्टुडिओ चे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नामदेव समाज संस्थेचे पदाधिकारी व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.





