E-Paper

प्रमोद जगन्नाथ थोरवडे यांचे दीर्घ आजाराने दुःख निधन 

कराड

प्रमोद जगन्नाथ थोरवडे यांचे दीर्घ आजाराने दुःख निधन 

कराड प्रतिनिधी — येथील बुधवार पेठेतील जेष्ठ नागरिक दिवंगत प्रमोद जगन्नाथ थोरवडे यांचे मंगळवार दिनांक १९ मे रोजी दुपारी ३.३० वाजता वयाच्या ७२ व्या वर्षी दुःख निधन झाले.

दिवंगत प्रमोद जगन्नाथ थोरवडे यांनी १९८० च्या दशकात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतर चळवळीत पॅंथरचे नेते रामदासजी आठवले यांचे सोबतदलित पँथरच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. 

ते कराड तालुक्यात व परिसरात कवाडे दादा म्हणून परिचित होते.त्यांची ओळख लाग मार्च प्रणते प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या केसांनी व त्यांच्या दाढी मुळे त्यांना ही प्रती कवाडे असे संबोधले जायचे. ते कुशल फर्निचरचे काम करायचे त्यामुळे त्यांना मिस्त्री म्हणूनही ओळखले जायचे.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना व नातवंडे व चार भाऊ एक बहीण असा मोठा परिवार असून ते घरामध्ये सर्वात मोठे होते. त्यांच्या दुःख निधनामुळे बुधवार पेठेतील सामाजिक व राजकीय कार्यकर्तानी दुःख व्यक्त केले आहे. त्यांचा अंत्यविधी कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत रात्री उशिरा केला जाणार असल्याची माहिती त्यांच्या परिवाराकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!