कराडच्या बस स्थानकावर जबरी चोरी करणाऱ्या आरोपीत पती-पत्नीस अटक
जबरी चोरीतील एक लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

कराडच्या बस स्थानकावर जबरी चोरी करणाऱ्या आरोपीत पती-पत्नीस अटक
जबरी चोरीतील एक लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
कराड प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर 721/2026 भारतीय न्याय संहीता कलम 309 (4), 351(2), 3 (5), प्रमाणे नोंद आहेत.
सदर गुन्हयातील फिर्यादी महिला यांना आरोपीत याने दिनांक 22/06/2026 रोजी रात्री 09.20 वा. चे सुमारास कराड बस स्टॅण्डजवळील नवग्रह मंदीर पासुन एस.टी. स्टॅण्ड मध्ये चालत जात असताना काळ्या रंगाचा टॉप घातलेली एक महिला व पांढ-या रंगाचा शर्ट घातलेला एक पुरुष यांनी फिर्यादी यांना अचानकपणे आडवुन जीवे मराण्याची धमकी देवुन, अचनाकपणे फिर्यादीचे गळ्यतील मंगळसुत्र खेचुन त्यांना ढकलुन खाली पाडुन गळ्यातील मंगळसुत्र जबरी चोरी करून घेवुन गेले होते. सदरबाबत कराड शहर पेलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय गोडसे हे करीत होते.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान बस स्टॅन्ड परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज व रुट पाहणी केली असता एक संशयीत महिला व पुरुष नमूद वर्णनाचे कपडे घालून घटनेच्या अगोदर वावरतांना दिसत होते. नमूद बाबीचा पोलीसांनी धागा पकडून अधिक तपास केला असता रेकॉर्डवरील गुन्हेगार 1) श्रावण राजेश कांबळे वय 33 वर्षे व त्याची पत्नी 2) पुनम श्रावण कांबळे वय 27 वर्षे. दोन्ही रा. कराड हे दोघे संशयीत रित्या कारण नसतांना त्या परिसरात वावरत असतांना दिसून आले. नमूद बाबींवरुन सदर रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांन ताब्यात घेवून प्राथमिक तपास करुन दिनांक 23/06/2026 रोजी अटक केले होते. आरोपीत हे पोलीस कस्टडीमध्ये रिमांड मध्ये असतांना त्यांनी दिलेल्या माहितीवरुन व निवेदनावरुन सदर गुन्हयातील गेलेला माल 1,5,000/- रु. किंमतीचा 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र आहे त्या स्थितीत मिळून आलेने तपासकामी जप्त केलेले आहे.
नमूद गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपीतकडे अधिक तपास केला असता आरोपी यांनी अशा प्रकारचे कराड शहर पोलीस ठाणे हद्यीत इतर 03 गुन्हे केल्याचे उघड झालेले आहे. तपासादरम्यान आरोपीतकडून एकूण 4 गुन्हयाची उकल झालेली असून त्यातील गेला मुद्येमाल व अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. निखील पिंगळे सो, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्रीमती वैशाली कडूकर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय दराडे, सहा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय गोडसे, पोलीस उप निरीक्षक (गुन्हे प्रकटीकरण शाखा) निखील मगदूम, पोलीस हवालदार वसीम संदे, सतिश पाटील, संदीप कुंभार पोलीस नाईक सज्जन जगताप, . अनिल स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल धिरज कोरडे, मुकेश मोरे, . दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, मोहसीन मोमीन, महेश पवार, . निलेश विभुते, . आनंदा जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल . सोनाली पिसाळ असे पथकाने कारवाई केलेली आहे.




