E-Paper

मॉडिफाइड सायलेन्सर बसवलेल्या दुचाकी व ब्लॅक फिल्म लावलेल्या चार चाकी वाहन चालकांवर कारवाई

कराड शहर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई   

मॉडिफाइड सायलेन्सर बसवलेल्या दुचाकी व ब्लॅक फिल्म लावलेल्या चार चाकी वाहन चालकांवर कारवाई

कराड शहर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई

कराड प्रतिनिधी :- दि. 22.07.26 याबाबत अधिक माहिती अशी की कराड शहरातील वाहतूक सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कराड शहर वाहतूक शाखेकडून आज विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली !

या मोहिमेदरम्यान वाहनांच्या काचांवर नियमबाह्य ब्लॅक फिल्म लावलेल्या चारचाकी वाहनांवर तसेच बुलेट व इतर दुचाकींना नियमबाह्य मॉडिफाईड (Modified) सायलेन्सर बसवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली !

संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म जागेवरच काढून टाकण्यात आली तसेच मॉडिफाईड सायलेन्सरधारक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली !

नियमबाह्य ब्लॅक फिल्ममुळे वाहनातील हालचाली बाहेरून स्पष्ट दिसत नसल्याने गुन्हेगारी कृत्यांना वाव मिळू शकतो. तसेच मॉडिफाईड सायलेन्सरमधून होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे ध्वनीप्रदूषण वाढून ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा वाहनांवर सातत्याने विशेष कारवाई करण्यात येत आहे !

कराड वाहतूक शाखा यांचे कडून वाहनचालकांना मोटार वाहन कायद्याचे पालन करण्याचे, वाहनांमध्ये कोणतेही नियमबाह्य बदल न करण्याचे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले !

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार आहे !

कराड शहर वाहतूक शाखेने नागरिकांना सुरक्षित, शिस्तबद्ध व प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!