E-Paper

कराड दक्षिणमध्ये ५ सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांसाठी २.१६ कोटींचा निधी

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचा पाठपुरावा; जलयुक्त शिवारच्या कामांना मिळाली गती

कराड दक्षिणमध्ये ५ सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांसाठी २.१६ कोटींचा निधी

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचा पाठपुरावा; जलयुक्त शिवारच्या कामांना मिळाली गती

कराड, प्रतिनिधी :-  दिनांक 28 याबाबत अधिक माहिती अशी की  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कासारशिरंबे, साळशिरंबे व तुळसण या गावातील ५ सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांच्या कामांना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या निधीमुळे संबंधित गावांमधील भूजल पातळी उंचावण्यास मदत होणार असून, त्याचा मोठा फायदा या भागातील शेतीला होणार आहे !

कराड दक्षिणमधील कासारशिरंबे, साळशिरंबे व तुळसण या गावांना दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येते. शिवाय शेतीसाठी पाण्याअभावी अनेक अडचणीही निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याची कामे मार्गी लावण्याची मागणी केली होती !

ग्रामस्थांची ही गरज ओळखून आ.डॉ. भोसले यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. याची दखल घेत मृदा व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार २.० अंतर्गत विविध ५ बंधाऱ्यांच्या कामासाठी एकूण २ कोटी १६ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. या माध्यमातून कारसारशिरंबे येथील सिमेंट काँक्रीट बंधारा क्र. ७ (४४.७९ लाख) आणि बंधारा क्र. ८ ( ₹४४.५९ लाख), तसेच साळशिरंबे सिमेंट काँक्रीट बंधारा क्र. १ (४४.०८ लाख) आणि तुळसण सिमेंट काँक्रीट बंधारा क्र. १ (४२.५६ लाख) व बंधारा क्र. २ (४०.३६ लाख) यांची कामे करण्यात येणार आहे !

या बंधाऱ्यांच्या कामांमुळे भूजल पुनर्भरणास चालना मिळणार आहे. तसेच विहिरी, बोअरवेल आणि ओढ्यांमधील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांना वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांमधून आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आणि भाजपा-महायुती सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!