E-Paper

कराड शहरात विनापरवाना फ्लेक्सबोर्ड 

पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरात फ्लेक्स झळकू लागले 

कराड शहरात विनापरवाना फ्लेक्सबोर्ड 

पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरात फ्लेक्स झळकू लागले 

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की सध्या कराड शहरात विनापरवाना फ्लेक्स वाढू लागले असून याबाबत अनेक वेळेला विविध दैनिकामधून तसेच अनेक व्रत्तवाहिन्या मधून व्रत्त प्रसिद्ध करून देखील परिस्थिती जैसे थे दिसून येत असून विनापरवाना फ्लेक्स वरती पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असून याबाबत फिरते पथक नेमणे, मनाईच्या ठिकाणी फ्लेक्स लावणाऱ्या वरती कारवाई करताना सातत्य राहणे गरजेचे !

तसेच जे कोणी विनापरवाना फ्लेक्स लावण्यासाठी मदत करतात त्यांच्यावरती देखील दंडात्मक आणि कडक कारवाई होणे गरजेचे आहे कारण स्वतःचा व्यवसाय करत असताना नियमावली देखील पाळणे गरजेचे आहे आपण एखाद्या ठिकाणी फ्लेक्स लावायचा फ्लेक्स बोर्ड बनवायचा किती दिवस लावायचे याचे सर्व प्रकारचे चार्जेस घेत असतात परंतु हे सर्व करत असताना ज्या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावायचा आहे त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीने परवाना घेतला आहे का जर त्याने परवाना घेतला असेल तर त्या फ्लेक्स बोर्ड वरती परवान्याचा उल्लेख केला पाहिजे आणि ते गरजेचेच आहे याची देखील दक्षता आणि घेणे गरजेचे आहे व्यवसाय करण्यास हरकत नाही परंतु कायदा व सुव्यवस्था देखील पाळणे गरजेचे आहे नियमावली पाळणे गरजेचे आहे  

विनापरवाना फ्लेक्सबोर्ड लावण्याकरिता काही फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिक खतपाणी तर घालत नाहीत ना ? 

असा सवाल याठिकाणी उपस्थित होऊ लागला आहे काही फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिक फक्त फ्लेक्स बनवून देण्याचेच काम न करता मागणी नुसार फ्लेक्स बोर्ड फ्रेम बनविणे , तो बोर्ड तयार झाल्यावर चौका चौकात मोक्याच्या ठिकाणी नेऊन लावणे , भाडे स्वरूपात जेवढ्या दिवसाचे पैसे मिळाले असतील तेवढे दिवस फ्लेक्स लावणे व नंतर मात्र न चुकता फ्लेक्सबोर्ड फ्रेमसह घेऊन जाण्यात माहीर असतात त्यांना हे सर्व स्वतःचा व्यवसाय करताना स्वतःच्या फायद्यासाठी जमते परंतु ज्याची सुपारी घेतली आहे त्याने नगरपालिकेकडून फ्लेक्स लावण्यासंदर्भात परवानगी घेतली आहे का ? याची खात्री करणे व परवानगीची पावती फ्लेक्सबोर्ड वर लावणे गरजेचे आहे !

स्वतःचा व्यवसाय करा पण नियमावली पाळा आणि जो कोणी नियमावली पाळणार नाही त्याच्यावरपालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे !

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!