मोटरसायकल चोरी प्रकरणी सराईत मोटरसायकल चोरट्यास अटक
आरोपीताकडून एकुण 4 मोटारसायकल हस्तगत / सातारा शहर डी. बी. पथकाची कामगिरी

मोटरसायकल चोरी प्रकरणी सराईत मोटरसायकल चोरट्यास अटक
आरोपीताकडून एकुण 4 मोटारसायकल हस्तगत / सातारा शहर डी. बी. पथकाची कामगिरी
सातारा प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की मा.पोलीस अधिक्षक साो, निखील पिंगळे, मा.अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांनी सातारा शहरातून चोरीस जाणारे मोटारसायकल चोरटयाचा शोध घेणेबाबत डी.बी. पथकास सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सातारा डी.बी. पथकाने रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरटयांचे हालचालीवर लक्ष ठेवून होते. मोटारसायकल चोरीतील एक सराईत चोरटा नामे युवराज आकोबा निकम वय 56 वर्षे रा. पिंपोडे बु” ता. कोरेगाव जि. सातारा हा वाढे फाटा परिसरामध्ये मोटारसायकलवरून जाताना दिसून आल्याने त्याचा पाठलाग करून डी.बी. पथकाने त्यास पकडले.
त्याचेजवळ एक विनानंबर प्लेट मोटारसायकल मिळून आल्याने सदर मोटारसायकलबाबत चौकशी केली असता ती चोरी केली असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी तीन मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्या अनुशंघाने तपास केला असता त्याने खालीलप्रमाणे मोटारसायकल अशी वाहने चोरी केली असल्याचे सांगितले.
1) सातारा शहर गुर नंबर 546/2026 हिरो होंडा स्प्लेंन्डर मो.सा. एम.एच.11 सी.पी.7364
2) सातारा शहर गुर नंबर 221/2026 होंडा शाईन मो.सा. एम.एच.11 सी.यु.2299
3) बोरगाव पो.स्टे. गुर नंबर 347/2025 हिरो एच ए डिलक्स मो.सा. एम.एच.11 ए.एस. 4549
4) तपासावर:- हिरो एच ए डिलक्स मो.सा. एम.एच.11 ए.जे.7108
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक साो, निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती, मा. डॉ. वैशाली कडूकर, उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. विपुल पाटील, मा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, विकास मोरे, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, अशिकेष डोळस सचिन आदमाने यांनी केलेली आहे.




