E-Paper

कृष्णा विश्व विद्यापीठात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

स्वातंत्र्य दिन

कृष्णा विश्व विद्यापीठात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कराड प्रतिनिधी ता. १५ : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या प्रांगणात कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहाच्यावतीने ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील विविध सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी व विद्यार्थ्यांनी शानदार ध्वजसंचलन केले. 

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर डॉ. सुरेश भोसले यांच्यासोबत आ.डॉ. अतुलबाबा भोसले, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा व उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांनी सुरक्षारक्षकांकडून मानवंदना स्वीकारली.

याप्रसंगी सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, डॉ. रजनी गावकर, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, संशोधन संचालक (नि. ब्रिगेडियर) डॉ. हिमाश्री, डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. एस. आर. पाटील, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, डॉ. जी. व्ही. रामदास, कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, माजी नगरसेवक अतुल शिंदे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजारोहणानंतर कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील विविध सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी व विद्यार्थ्यांनी मुख्य सुरक्षा अधिकारी दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शानदार ध्वजसंचलन केले. यावेळी जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, कृष्णा विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, फार्मसी महाविद्यालयाच्या डॉ. शुभांगी पाटील, सहाय्यक कुलसचिव अस्मिता देशपांडे आदींसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇👇 येथे क्लिक करा 

 

कराड : कृष्णा विश्व विद्यापीठात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणप्रसंगी कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा व उपकुलसचिव एस. ए. माशाळकर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!