E-Paper

जिल्हा व सत्र न्यायालय कराडमध्ये राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीरित्या पार 

सहा कोटीहून अधिक वसुली तर 500 च्या वर केसेसचा निपटारा   

जिल्हा व सत्र न्यायालय कराडमध्ये राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीरित्या पार 

सहा कोटीहून अधिक वसुली तर 500 च्या वर केसेसचा निपटारा

कराड प्रतिनिधी  :- याबाबत अधिक माहिती अशी की  माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार या वर्षातील शेवटची राष्ट्रीय लोक अदालत कराड जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली, आजच्या या लोक आदालतीमध्ये दाखल पूर्व एकूण 5696 प्रकरणे ठेवली होती तसेच दाखल आणि प्रलंबित असलेले 3690 प्रकरणे ठेवली होती , त्यापैकी दाखल पूर्व प्रकरणांमध्ये 296 प्रकरणात तडजोड झाली तसेच दाखल आणि प्रलंबित प्रकरणात मोठ्या प्रमाणात म्हणजे 500 हून अधिक केसेसचा निपटारा आज झाला, या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आज सहा कोटी 35 लाख 79 हजार 279 रुपये एवढी वसुली झाली, या राष्ट्रीय लोक आदालतीमध्ये श्रीराम फायनान्स जनकल्याण पतसंस्था व इतर अनेक पतसंस्थांनी आपल्या केसेस ठेवल्या होत्या, तसेच दाखल पूर्व प्रकरणात नगरपालिका ग्रामपंचायत यांनी आपल्या केसेस ठेवल्या होत्या, तसेच कराड तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन व डीवायएसपी कार्यालयाने देखील राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सहभाग घेतला होता  या केसेसमध्ये तडजोड करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

पहा खाली व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा न्यायाधीश यु.एल. जोशी  व जिल्हा न्यायाधीश डी.बी. पतंगे  व कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक थोरात यांनी दिलेली सविस्तर माहिती 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!