वारुंजी गणातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा युवा नेते उमर फारूक सय्यद यांच्यावतीने करण्यात आला सत्कार
नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
याबाबत अधिक माहिती अशी की मागील काळात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीत वारुंजी जिल्हा परिषद गट व गण यामध्ये अटी तटी चे निवडणुकीत वारुंजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुनंदा नामदेव पाटील व वारुंजी गणात पंचायत समिती सदस्य रविंद्र सर्जेराव बडेकर यांचा विजय झाला, या अनुषंगाने गोटे गावचे युवा नेते उमरफारूक सय्यद मित्रपरिवार यांच्या तर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा पहिलाच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता
यावेळी प्रास्ताविक ॲड साबीर मुल्ला, युवा नेते उमरफारूक सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले, विजय माने व नामदेव पाटील आप्पा यांची भाषणे झाली यावेशी नामदेव अप्पांनी गोटे गाव व काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी सदैव तत्पर राहून तालुक्यात काँग्रेस ची फळी बांधणार असल्याचे सांगितले.
यावेळी गोटे गावचे माजी सरपंच स्व शौकत सय्यद यांचे बंधू ज्येष्ठ नेते शब्बीर सय्यद, व इस्माईल सय्यद यांच्या हस्ते नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला, यावेळी माजी सरपंच अशरफ मुल्ला, माजी सरपंच लाजम होडेकर, माजी सरपंच अजीम इनामदार, मुजीर इनामदार, युवा नेते मुराद आगा,सुरेश भोसले, शिवाजी जमाले, जुबेर सय्यद, बशीर देसाई, रफीक आगा,मुनीर देसाई, सलीम सय्यद, अभिजीत पवार, संदीप वायदंडे, मोहसीन शेख,वैभव खांडेकर, मुख्तार इनामदार माजी उपसरपंच समीर सय्यद, खालिद पटेल, जमीर आगा, नोमान सय्यद, रेहान सय्यद व गोटे गावचे ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.अजीम इनामदार यांनी आभार मानले





