कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात युवकासह तरुणीचा गोंधळ
उपजिल्हा रुग्णालयात रात्रीच्या वेळेस महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात युवकासह तरुणीचा गोंधळ
उपजिल्हा रुग्णालयात रात्रीच्या वेळेस महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे
कराड प्रतिनिधी :- या बाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास एक युवक तिच्या सोबत असलेल्या तरुणीला घेऊन कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात तिच्या हाताला लागलेल्या जखमेची मलमपट्टी करण्यासाठी घेऊन आला होता. ती जखम पाहता संबंधित डॉक्टरांनी तुम्ही उद्या या आपण उद्या त्या जखमेची मलमपट्टी व जे काही टाके असतील ते उद्या करु हे काय आत्ताच केले पाहिजे असे नाही. इथे इमरजन्शी पेशंट बघितले जातात तुम्ही उद्या सकाळी या आपण योग्य उपचार करू असे सांगितल्यावर तो युवक डॉक्टर आणि तिथं असलेल्या सुरक्षा रक्षक यांना अरेरावी करुन डॉक्टरांसहीत इतर कर्मचारी यांना शिविगाळ व दमदाटी करू लागले त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखता उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले ,
पोलीस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर पोलिसांनाही न जुमानता त्या युवक युवतींनी गोंधळ सुरूच ठेवला , पुढे त्यातील युवक म्हणाला माझा भाऊ पीएसआय आहे , तुम्ही का करत नाही म्हणून जोरजोराने आरडाओरडा करुन रुग्णालय परिसरात त्यांने गोंधळ घालण्यास सुरुवात केली , उपस्थित नागरिकांच्या व रुग्णांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार संबंधित युवक व युवती यांनी मद्यप्राशन केले असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही , कारण गोंधळ घालून ऐकण्याच्या मनस्थितीत नसणाऱ्या त्या युवतीला काही वेळाने तेथील कर्मचारी यांनी तिच्या हाताच्या जखमेची मलमपट्टी करण्यासाठी आत बोलावून उपचार सुरू केले
, घडलेल्या संपूर्ण प्रकाराची व परिस्थितीची माहिती घेत असताना स्थानिक न्यूज चॅनेल चे प्रतिनिधी यांनी या गोंधळाच्या परिस्थितीचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता संबंधित तरुणीने त्या न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधीला अवार्च भाषेत शिविगाळ करत तेथे आलेल्या पोलीसांसमोरच खिशातून मोबाईल हिसकावून घेतला व जे काही व्हिडिओ केले आहेत ते डिलीट केल्याशिवाय मी मोबाईल परत देणार नाही ,अशी भूमिका त्या तरुणीने घेतली होती ,परंतु त्या ठिकाणची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी आलेल्या पोलीसांनी तो मोबाईल आपल्या ताब्यात घेऊन त्या न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधीला परत केला ,
न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधीला काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून अशा आशयाची विनंती आली की तुम्ही बातमी द्वारे ही सर्व हाकिकत मांडा , व अशा प्रकारचे गैर कृत्य करणाऱ्या युवकाची व त्या तरुणीची सखोल चौकशी पोलीस प्रशासनाने करावी आणि या उपजिल्हा रुग्णालयात अशा पद्धतीने डॉक्टर व कर्मचारी यांना वेठीस धरून जर कोणी गैर कृत्य करत इतर रुग्णांना उपचार मिळण्यास जाणून बुजून अडथळे निर्माण करत असेल तर अशा लोकांवर पोलीस प्रशासनामार्फत कडक कारवाई व्हावी
व उपजिल्हा रुग्णालय कराड येथे रात्रीच्या वेळी सुरक्षितेच्या दृष्टीने व कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने महिला पोलीस कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे , अशी आमची मागणी प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रशासनापर्यंत पोहोचवावी अशी विनंती देखील यावेळेस रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली !
सदरच्या संपूर्ण प्रकाराबाबत माय मराठी टीव्ही च्या कार्यालयाकडे व्हिडिओ उपलब्ध झाले असून संपूर्ण प्रकाराबाबत कोणास काही शंका असल्यास माय मराठी टीव्ही शी संपर्क साधावा पुराव्यानिशी सर्व माहिती दिली जाईल !




