E-Paper

राजकारणासाठी आंदोलन करण्यापेक्षा प्रभागाच्या विकासासाठी आपण गेल्या सात महिन्यात नेमके कोणते ठोस काम केले ? याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा 

यशवंत विकास आघाडीचे युवा नेते इंद्रजीत प्रताप भोपते यांचा भाजपाच्या विद्यमान नगरसेवकांना सवाल !

राजकारणासाठी आंदोलन करण्यापेक्षा प्रभागाच्या विकासासाठी आपण गेल्या सात महिन्यात नेमके कोणते ठोस काम केले ? याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा 

यशवंत विकास आघाडीचे युवा नेते इंद्रजीत प्रताप भोपते यांचा भाजपाच्या विद्यमान नगरसेवकांना सवाल !

केवळ आंदोलनाची भाषा नव्हे, तर विकासकामांचा प्रामाणिक आढावा द्या !

कराड नगरपालिकेची निवडणूक होऊन सुमारे सात महिने झाले आहेत. सध्या जे महाशय बैल बाजार रोडच्या विषयावर आंदोलनाची भाषा करत आहेत, त्यांनी सर्वप्रथम नागरिकांना हे स्पष्ट करावे की, बीपीसीएलचा विषय दोन महिन्यांपूर्वी समोर आल्यानंतरच त्यांना जाग का आली? उर्वरित पाच महिने ते नेमके काय करत होते, याचे उत्तर त्यांनी जनतेसमोर द्यावे.

एकीकडे रस्त्याच्या कामाची किंमत सुमारे 1 कोटी 57 लाख असल्याचे सांगितले जाते; परंतु त्या रस्त्यापूर्वी तेथील अत्यावश्यक ड्रेनेज लाईनचे काम करणे गरजेचे होते की नव्हते, याचे उत्तरही त्यांनी द्यावे. विकासकामांचे नियोजन करताना केवळ रस्ता नव्हे, तर भविष्यातील गरजांचा विचार करणे आवश्यक असते.

आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून सुमारे 25 लाख 84 हजार दोनशे रुपये एवढ्या रकमेची अत्याधुनिक ड्रेनेज लाईन मंजूर करून प्रत्यक्षात आणण्यात आली. हा खरा विकासाचा पाया आहे. ड्रेनेजची सुविधा नसताना रस्ता केला असता, तर पुढे तो पुन्हा उकरावा लागला असता आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला असता.

आज काहीजण फक्त रस्त्याच्या विषयावर राजकारण करत आहेत; परंतु प्रभागाला प्रत्यक्षात कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याची त्यांना खरी जाण आहे का, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. विकास म्हणजे केवळ घोषणाबाजी किंवा आंदोलन नव्हे, तर योग्य नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि दीर्घकालीन दृष्टीकोन होय.

मराठीत एक म्हण आहे, “जखम मांडीला आणि मलम शेंडीला.” सध्याचे आंदोलन नेमके याच म्हणीची आठवण करून देणारे आहे. मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न नागरिक ओळखून आहेत.

राजकारणासाठी आंदोलन करण्यापेक्षा, प्रभागाच्या विकासासाठी आपण गेल्या सात महिन्यांत नेमके कोणते ठोस काम केले, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा. कराडकरांना घोषणांपेक्षा विकासाची कामे आणि त्यामागील प्रामाणिक नियोजन महत्त्वाचे आहे.

इंद्रजीत प्रताप भोपते

युवा नेते यशवंत विकास आघाडी कराड

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!