E-Paper

कृष्णा’च्या आरोग्य वारीने दिली वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा

गेली २५ वर्षे अव्याहतपणे उपक्रम सुरु; वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

कृष्णा’च्या आरोग्य वारीने दिली वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा

गेली २५ वर्षे अव्याहतपणे उपक्रम सुरु; वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

कराड, ता. २३ : कृष्णा हॉस्पिटलने आपल्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमांतर्गत पंढरपूर वारी मार्गावर सुमारे दोन हजारांहून अधिक वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली. यंदा या उपक्रमाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, गेली सलग २५ वर्षे अव्याहतपणे सुरु असलेल्या या उपक्रमाचे वारकऱ्यांनी विशेष कौतुक केले. 

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचा जनसागर पंढरपूरकडे जात आहे. या अध्यात्मिक यात्रेत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने गेली २५ वर्षे ‘आरोग्य वारी’ उपक्रम राबविला जात आहे. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना पंढरपूर येथील वारीमार्गावर ठिकठिकाणी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाकडून मोफत आरोग्य तपासणी करुन, औषधे देण्यात आली. यावेळी पायी चालण्यामुळे वारकऱ्यांना होणारे स्नायू विकार, ताप, थकवा, डोकेदुखी, पायांची सूज अशा तक्रारींसाठी तात्काळ औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच गरजेनुसार औषधे, मलमपट्टी व फिजिओथेरपी सुविधादेखील मोफत देण्यात आली. वारकऱ्यांनी या आरोग्य वारी उपक्रमाला उदंड प्रतिसाद देत, कृष्णा हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 

दहा दिवस चाललेल्या या उपक्रमात कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जगताप, कॅम्प सुपरवायझर सुनील यादव, डॉ. पृथा जावकर, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. अभिषेक बारी, डॉ. सिद्धार्थ आहेर, डॉ. साक्षी बोराटे, डॉ. समीक्षा पाटील, विशाल मोहिते, रिमा मोहिते, उषा सोनार, संभाजी देसाई, स्मिता पाटील, चंद्रकांत चव्हाण आदींसह वैद्यकीय तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. 

पळशी : कृष्णा हॉस्पिटलतर्फे राबविण्यात आलेल्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमांतर्गत वैद्यकीय सेवेचा लाभ घेताना वारकरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!