गाळा धारकांनी केलेले अतिक्रमण… पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला दोन दिवसाचा अल्टिमेट…
अन्यथा पालिका स्वतःहून हटवणारा अतिक्रमणे

गाळा धारकांनी केलेले अतिक्रमण… पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला दोन दिवसाचा अल्टिमेट…
अन्यथा पालिका स्वतःहून हटवणारा अतिक्रमणे
कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की कराड नगर परिषदेच्या मालकीचे कार्वे नाका पाण्याच्या टाकीच्या खाली तीस गाळे असून ते पालिकेने भाडेतत्त्वावरती दिले असून सदरच्या गाळ्याच्या अवतीभवती पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गाळा धारकांकडून काही ठिकाणी बांधकाम करण्यात आलेले आहे तर काही ठिकाणी कट्टे बांधण्यात आलेले आहेत तर काही ठिकाणी भले मोठे पत्र्याचे शेड बांधण्यात आलेले आहेत
तसेच याच शेडमध्ये पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता खाद्यपदार्थांचे हात गाडी लावण्यात आलेले आहेत तसेच दोन गाळ्यांमध्ये हॉटेल्स देखील सुरू करण्यात आलेले आहेत , याबाबत पालिकेच्या निदर्शनास आणून देण्याकरिता काही जणांनी प्रत्यक्षपणे तर काही जणांनी अप्रत्यक्षपणे लेखी तसेच तोंडी तक्रारी पालिकेमध्ये केल्याचे नमूद करत कराड नगर परिषदेच्या संबंधित विभागाकडून या सर्व 30 गाळा धारकांना नोटीस बजावण्यात आली होती
सर्वप्रथम आपण पाहूयात त्या नोटिसीमध्ये नेमके काय म्हटले होते
👇👇👇👇👇👇👇👇
दिनांक 12 JUN 2026
प्रति.
सर्व गाळेधारक
कार्वेनाका पाण्याची टाकी परिसर, गाळा क्र. (१ ते ३०) शनिवार पेठ, कराड.
विषय :- गाळा व सभोवतालचे अतिक्रमण तात्काळ काढून घेणेबाबत..
कराड नगरपरिषद पेठ शनिवार कार्वेनाका पाण्याची टाकी या शॉपिंग सेंटरमध्ये नगरपरिषदने आपणास गाळे भाड्याने दिलेले आहेत.
(गाळा क्र.१ ते ३०) सदर गाळ्याचे परिसरामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेचे दिसून येत आहे.
यामध्ये गाळ्याचे समोर कट्टे बांधणे, पत्र्याचे शेड उभारणे, चायनीज अथवा वडापाव तसेच इतर खाद्यपदार्थांचे हातगाडे लावणे यासारख्या अनेक बाबी निदर्शनास आलेल्या आहेत.
याबाबत अनेक लेखी व तोंडी तक्रारी नगरपरिषदेस प्राप्त झालेल्या असून आपणास याबाबत वारंवार सूचित करण्यात येऊन सुद्धा सदर अतिक्रमणे आपण अद्याप हटवलेली नाहीत.
ही बाब अतिशय गंभीर असून ही नोटीस मिळताच येत्या ७ दिवसात सदरची अतिक्रमणे आपण तत्काळ काढून घ्यावीत अन्यथा त्यानंतर नगरपरिषदेमार्फत ही अतिक्रमणे हटवली जाणार असून त्यावेळी गाळाधारकाचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याला नगरपरिषद जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
तसेच येत्या ७ दिवसात जे गाळेधारक आपली अतिक्रमणे हटवणार नाहीत त्यांचा गाळा तत्काळ प्रभावाने नगरपरिषद ताब्यात घेऊन भाडे करार रद्द करेल याची स्पष्ट नोंद घ्यावी
असे या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले होते सदरच्या नोटीसीला 12 जून 2026 पासून दिनांक 27 जुलै 2026 पर्यंतचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील यापैकी एकाही धारकाने स्वतःहून अतिक्रमण काढले नाही याउलट यांचे व्यवसायाचे फ्लेक्स बोर्ड अगदी मुख्य रस्त्यावरती देखील लागू लागले आहेत ,
सदर बाबत माय मराठी टीव्ही ने सदरच्या सर्व गाळ्यांचे प्रत्यक्ष वस्तुस्थिती दर्शवणारे व्हिडिओ चित्रीकरण करून वृत्त प्रसिद्ध केले होते , त्यानंतर मुख्याधिकारी कराड नगरपरिषद कराड श्री प्रशांत व्हटकर यांनी नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्याचे सुचित केले होते
त्याप्रमाणे दिनांक 27 जुलै 2026 रोजी नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे या गाळा धारकांना सूचना देत आज पासून पुढील दोन दिवसांमध्ये आपण आपल्या वापरात असलेल्या नगर परिषदेच्या गाळ्यासमोरील अनाधिकृत अतिक्रमणे त्यामध्ये बांधलेले कट्टे पत्र्याचे शेड गाळा सोडून इतर ठिकाणी केलेले बांधकाम गायाच्या बाहेरील खाद्यपदार्थांचे गाडी फ्लेक्स बोर्ड इत्यादी स्वतःहून न हटवल्यास पालिका हे अतिक्रमणे हटविणार असून यामध्ये संबंधित कोणाचेही नुकसान झाल्यास त्यास पालिका जबाबदार राहणार नाही !
त्यामुळे काही गाळाधारकांनी एकत्रित येत नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना व मुख्याधिकाऱ्यांना भेटण्याचे ठरविण्याचे बोलले जाते परंतु लोकनियुक्त नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी एक बाब लक्षात घ्यावी की या ठिकाणचे हे नगर परिषदेच्या गाळ्यातील गाळाधारक यांची संख्या व गाळे याचा विचार केला तर यामध्ये ज्याच्या नावे नगर परिषदेमध्ये गाळ्याची नोंद आहे यापैकी फक्त तीनच जण या ठिकाणी स्वतः व्यवसाय करतात
इतर गाळ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचे झाल्यास मालमत्ता नगरपालिकेची पण मलिदा खातोय तिसराच अशी अवस्था पहावयास मिळते तीन गाळा धारकांपैकी इतर सर्व गाळाधारकांनी आपल्या गाळ्यांमध्ये पोट भाडेकरू ठेवून मलिदा लाटण्याचे काम सुरू केलेले दिसून येत आहे ,
वास्तविक पाहता नगर परिषदेने हे गाळे बांधण्या पाठीमागचे उद्दिष्ट असे होते की स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांनी कराड नगर परिषदेचे 35 वर्ष नगराध्यक्ष पद सांभाळले होते त्यावेळेस स्वर्गीय पी डी पाटील साहेबांची एकच संकल्पना होती की कराड शहरातील गोरगरीब कष्टकरी नागरिकांना जर आपण नगर परिषदेमार्फत गाळे उपलब्ध करून दिले तर एखादा व्यवसाय करून त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो आणि याच उद्दिष्टाने कराड शहरातील नगर परिषदेच्या अनेक जागांमध्ये नगर परिषदेमार्फत गाळे बांधून ते गरजू लोकांना व्यवसायासाठी भाडेतत्त्वावरती देण्यात आले
परंतु आजची परिस्थिती पाहता या ठिकाणी ज्यांच्या नावे गाळा नोंद आहे तो गाळाधारक मात्र त्या ठिकाणी व्यवसाय करताना दिसतच नाही त्या ठिकाणी दिसतात ते फक्त पोट भाडे करू पोट भाडेकरूंकडून अवाढव्य स्वरूपात भाडे स्वीकारले जाते परंतु पालिकेला मात्र नाम मात्रच भाडे दिले जाते ,
यामुळे पालिकेचे देखील मोठे नुकसान होऊ लागले आहे तसेच पालिकेच्या नियमानुसार पालिकेच्या गाळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या पोट भाडेकरू ला ठेवता येत नाही तसेच पालिकेच्या गाळ्यांमध्ये हॉटेल व्यवसाय मटन चिकनचे दुकाने वर्कशॉप सुरू करता येत नाही , परंतु कार्वे नाक्यावरील नगरपरिषदेच्या या गाळ्यांच्या आसपास जर आपण फेरफटका मारला तर या ठिकाणी हॉटेल व्यवसाय दिसतील , चिकनचे दुकान दिसेल,वर्कशॉप दिसेल मग हे सुरू करताना पालिकेची परवानगी घेतली होती का ?
अशा सर्व गंभीर बाबींचा विचार लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी व मुख्याधिकाऱ्यांनी जरूर करावा आज आपण क्रमशा इथेच थांबू परंतु माय मराठी टीव्ही याचा पाठपुरावा करून जे काही सत्य आहे ते समोर आणण्याचा जरूर प्रयत्न करेल
मुख्याधिकाऱ्यांनी व नगराध्यक्षांनी खालील फोटो द्वारे आजची परिस्थिती लक्षात घ्यावी
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇





