E-Paper

रेठरे बुद्रुक येथील कृष्णाघाटाचा लोकार्पण सोहळा रेठरे बुद्रुक च्या माहेरवाशीन तथा राज्यसभेच्या माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात संपन्न !

कृष्णाघाटाचा लोकार्पण सोहळा

रेठरे बुद्रुक येथील कृष्णाघाटाचा लोकार्पण सोहळा रेठरे बुद्रुक च्या माहेरवाशीन तथा राज्यसभेच्या माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात संपन्न !

 कराड प्रतिनिधी दि.२२ : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे साकारण्यात आलेल्या नव्या कृष्णाघाटाचे लोकार्पण रेठरे बुद्रुकच्या माहेरवाशीण तथा राज्यसभेच्या माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या कृष्णाघाट परिसरात येत्या काळात ‘रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट’ प्रकल्पांतर्गत अनेक नाविण्यपूर्ण योजना राबविल्या जाणार असून, यामुळे कृष्णाकाठच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यावेळी केले. 

रेठरे बुद्रुक येथील श्री शंभू महादेव मंदिरासमोरील कृष्णाकाठावर उभारण्यात आलेल्या घाटासाठी माजी खासदार ॲड. चव्हाण यांनी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून साकारण्यात आलेल्या या घाटाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ॲड. चव्हाण यांच्या भगिनी तथा सुप्रसिद्ध लेखिका विनीता अशोक कामटे, ॲड. हेमंत चव्हाण, राहुल कामटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या लोकार्पणप्रसंगी बोलताना ॲड. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, मी १२ वर्षे खासदार म्हणून काम केले. आपल्या गावासाठी काहीतरी करता यावे, अशी मनात नेहमीच रुखरुख होती. कृष्णानदी आणि रेठरे बुद्रुक गावाशी माझे अतिशय भावनिक नाते आहे. लहानपणापासून या नदीकाठचे सौंदर्य आम्ही अनुभवले आहे. त्या भावनेतून कृष्णाघाटाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देता आला आणि आज या घाटाचे लोकार्पण होत असल्याचा मला विशेष आनंद आहे. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली या घाटाचे आणखी सुशोभीकरण आणि विकास नक्की केला जाईल, असा मला विश्वास आहे.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ॲड. वंदनाताई चव्हाण यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दल आभार व्यक्त केले. कराडसह रेठरे बुद्रुक आणि आटके येथे कृष्णानदीकाठी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करण्यासाठी इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असून, या विकासकामांमुळे गावाचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पर्यटनाला चालना, रोजगाराच्या संधी आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आ.डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.

यावेळी जि.प. सदस्य प्रियांका साळुंखे, शैलजा शिंदे, कराड पंचायत समितीच्या सभापती नंदाताई यादव, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, सरपंच हणमंत सूर्यवंशी, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक छबन कांबळे, अरविंद पाटील, सुनीता शेवाळे, सुजाता जाधव, पंचायत समिती सदस्य अर्जुन कराळे, माजी सदस्य संजय पवार, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक जाधव, माजी जि. प. सदस्य श्यामबाबा घोडके, पैलवान आनंदराव मोहिते, कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, मलकापूरचे नगरसेवक हणमंतराव जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेठरे बुद्रुक : नव्या कृष्णाघाटाचे लोकार्पण करताना माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण. बाजूस डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, विनीता कामटे व अन्य मान्यवर.👇👇👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!