E-Paper

गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या आरोपीतास अटक

कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या आरोपीतास अटक

कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

बॅट-या चोरीचे 10 गुन्हे उघड 5,52,300/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

कराड प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि. 18/08/2026 रोजी सुपने ता. कराड येथुन मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे घरासमोर उभ्या केलेल्या टॅक्टर च्या बॅट-या चोरुन नेले बाबत कराड तालुका पोलीस ठाणेस गु.र.नं. गुरनं. 508/2026 भा. न्याय.स. कलम 303(2), प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सदर गुन्हयांच्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे साो. तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कड्डुकर सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदाम पाचोरकर साो, अतिरिक्त कार्यभार कराड उपविभाग, पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार कोल्हाळ साो, कराड तालुका पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश भुजबळ व त्यांचे पथकास मार्गदर्शन करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या.

सदर गुन्हयाचा तपासा करीत असताना गोपनीय बातमीदार यांचेकडुन मिळाले बातमीप्रमाणे यातील आरोपी हा टेंम्पो मधुन बॅट-या लपवुन कोल्हापुर च्या दिशेने जात असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून आटके टप्पा येथून सदर संशयीतास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता आरोपीत नामे सोहेल उस्मान सय्यद, वय 23 वर्षे, रा. गोटे ता. कराड, जि. सातारा याने सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नमुद गुन्हयात अटक करणेत आले असुन त्याने सुपने, साकुर्डी, म्होप्रे या गावातील रोड कडेला उभे असलेल्या वाहनांच्या बॅट-या चोरल्याची कबुली दिली आहे.

सदर आरोपीता कडुन 5,52,300/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री गणेश वेदपाठक हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे साो. तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर साो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदाम पाचोरकर साो, अतिरिक्त कार्यभार कराड उपविभाग, पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार कोल्हाळ साो, कराड तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश भुजबळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री नितीन येळवे, पोलीस हवालदार गणेश वेदपाठक सचिन निकम, पोलीस नाईक सागर शिवदास, किरण बामणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!