राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा डॉ.सुनिला लाळे यांच्या हस्ते शुभारंभ..
शहरातील विविध भागात मोबाईल टिम कार्यरत

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा डॉ.सुनिला लाळे यांच्या हस्ते शुभारंभ..
शहरातील विविध भागात मोबाईल टिम कार्यरत..
कराड प्रतिनिधी :– या बाबत अधिक माहिती अशी की, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने देशातील प्रत्येक गाव पातळीपासून ते वाड्या वस्त्यांपर्यत ० ते ५ वर्षाखालील बालकांना पोलिओची लस देण्यावर केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ कराड येथील स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ सौ सुनिला लाळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.ठोकळे, अधिपरीचारिका हर्षदा पाटील, सरस्वती धामणीकर, अश्र्विनी भोपते, आशा सेविका सविता पवार यांनी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत १८० बालकांना पोलिओची लस दिली.
तसेच उपजिल्हा रुग्णालय व कराड नगरपरिषद यांनीही शहरातील विविध ठिकाणी लसीकरण मोहीमेचे बुथ उभारुन बालकांना पोलिओची लस देण्यात आली. तसेच श्री. पी.डी.भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात फिरते मोबाईल टिमच्या माध्यमातून लसीकरणावर भर दिला. त्यांच्या समवेत अपर्णा इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थीनीं सुद्धा या मोहिमेत सहभाग घेतला. तसेच सोमवार पासून पाच दिवस घर टु घर भेटी देऊन बालकांना पोलिओची लस देण्यासाठी कोणतेही बालक या पासून वंचित राहणार नाही याची काळजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आली आहे तरी पालकांनी या लसीकरण मोहीमेत सहभागी होऊन पोलिओ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





