E-Paper

शहरात गेली अडीच महिने बंद असलेला बडा व्यवसाय सोमवार पासून ओपन सुरू होणार असल्याची चर्चा  

बड्या शेटजींना प्रायोगिक तत्वावर चाचणी यशस्वी झाल्याचा विश्वास 

शहरात गेली अडीच महिने बंद असलेला बडा व्यवसाय सोमवार पासून ओपन सुरू होणार असल्याची चर्चा  

बड्या शेटजींना प्रायोगिक तत्वावर चाचणी यशस्वी झाल्याचा विश्वास 

प्रतिनिधी माय मराठी टीव्ही :- याबाबत अधिक माहिती अशी की सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पदी मा. श्री. निखिल पिंगळे सर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जनहिताचा निर्णय घेत संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू होऊ न देण्याचे ठाम केले असून त्याप्रमाणे शहरात देखील त्याची अंमलबजावणी सुरू आहे

अपवाद वगळता चोरीछुपे सुरू असलेले अवैध व्यवसाय वगळता सध्या तरी गेले अडीच महिने झाले शहराला अवैध व्यवसायापासून सुटकारा मिळाला होता , तसेच चोरीछुपे सुरू असलेल्या अवैध व्यवसायिकांना शोधून काढून त्यांच्यावरती कारवाई करणेचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू होते आणि आहे ,

यातच भर म्हणून की काय गेली अडीच महिने खुलेआम पणे अवैध व्यवसाय न करता ज्यांनी मोबाईल द्वारे आपला व्यवसाय चोरीछुपे सुरू ठेवला असल्याची चर्चा होती , त्यातीलच एका बड्या शेटजींनी आपल्या टीम मधील काही बुकिंना आदेश देत खुलेआम पणे पूर्वीसारखे बुकिंग घेण्याचे काम सुरू करण्यास सांगितले असल्याचे चित्र कराड शहरांमध्ये दिसून आले ,

आपल्या बड्या शेटजींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काही बुकिंनीं उघडपणे शहरातील मुख्य रस्त्यालगत आपला अवैध व्यवसाय पुन्हा सुरू केला आणि चार दिवसांमध्ये प्रशासनाच्या नजरेस हा व्यवसाय न आल्याने किंवा या व्यवसायाबद्दल प्रतिस्पर्धी वगळता इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारची उलट-सुलट चर्चा न झाल्याने सोमवारपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे आपल्या अवैध व्यवसायाचे जाळे शहरांमध्ये पसरवण्याची पूर्ण तयारी झाली असून याबद्दल ची चर्चा प्रतिस्पर्धी अवैध व्यवसायिकांमध्ये जोर धरू लागली आहे

सोमवारी नेमके काय होते  काही तास याची वाट पहायला लागणार असून यांच्या हालचाली वरती पुढील सूत्रे व चित्र दिसून येतील !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!