E-Paper

मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक / मुद्देमाल जप्त

कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक 

मुद्देमाल जप्त 

कराड प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिकृत माहिती अशी की कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर 928/2026 भारतीय न्याय संहीता कलम 305 (अ), प्रमाणे नोंद आहे.

सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दिनांक 02/08/2026 रोजी रात्रो 10.00 वा ते दिनांक 03/08/2026 रोजी सकाळी 07.00 वा चे दरम्याण 256 मंगळवार पेठ कराड ता कराड जि सातारा येथील श्री रेणुका देवीचे मंदिरात आत प्रवेश करुन कोणीतरी अज्ञात इसमाने वरील वर्णानाचे व किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व तांब्याची व पितळेची भांडी चोरुन नेली आहेत.

सदरबाबत कराड शहर पेलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे सो, तसेच मा.अपर पोलीस अधीक्षक सो, श्रीमती वैशाली कडूकर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणणेचे सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे मा. श्री. दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता.

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीत मजकूर याची माहिती डी.बी. पथकातील मुकेश मोरे यांना माहिती मिळाला की, इसम नामे ऋषिकेश प्रदीप जाधव वय 20 वर्षे. रा. 248, शुक्रवार पेठ कराड ता. कराड याने सदरची चोरी केलेली आहे अशी माहिती मिळाल्याने सदर इसम नामे ऋषिकेश प्रदीप जाधव वय 20 वर्षे. रा. 248, शुक्रवार पेठ कराड ता. कराड यास ताब्यात घेवून त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिलेली असल्याने त्यास दिनांक 06/08/2026 रोजी 026 रोजी 21.44 वा. अटक करण्यात आलेली आहे.

आरोपीत हा पोलीस कस्टडीमध्ये रिमांड मध्ये असतांना त्यांनी दिलेल्या माहितीवरुन व निवेदनावरुन सदर गुन्हयातील गेलेला माल 75,000/- रु. किंमतीचा एक 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन वाट्या व मणी असलेले मंगळसुत्र जु.वा. किं.अ व एक तांब्याची कळशी, एक पितळेची कळशी हे तपासकामी जप्त केलेले आहे.

सदरची कारवाई  मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. निखील पिंगळे सो, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्रीमती वैशाली कडूकर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय दराडे, सहाय्यक  पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय गोडसे, पोलीस उप निरीक्षक (गुन्हे प्रकटीकरण शाखा) निखील मगदूम, पोलीस हवालदार  संदीप कुंभार,  वसीम संदे, पोलीस नाईक सज्जन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल  धिरज कोरडे,  मुकेश मोरे, दिग्वीजय सांडगे, अमोल देशमुख, मोहसीन मोमीन,  महेश पवार,  निलेश विभुते, आनंदा जाधव, विजय गुरव, महिला पोलीस कॉन्स्टेबल . सोनाली पिसाळ असे पथकाने कारवाई केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!