E-Paper

मावा विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई  

कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी देखील कराड शहरात खुलेआम मावा गुटखा विक्री सुरूच...

मावा विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई  

कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी देखील कराड शहरात खुलेआम मावा गुटखा विक्री सुरूच…

कराड शहरातील मुजावर कॉलनी शांतीनगर येथील साहिल मज्जिद शेख वय वर्ष 26 याच्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई  

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटखा तसेच प्रोसेसिंग केलेल्या सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवरती मोक्का अंतर्गत तसेच विविध कलमान्वये कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त माननीय श्री तुकाराम मुंडे साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयांना दिलेले असून याची सक्त अंमलबजावणी करण्याचे सूचित केले आहे ,

त्या अनुषंगाने माय मराठी टीव्हीचे प्रतिनिधी कराड शहर आणि परिसरामध्ये फिरत असताना त्यांना असे निदर्शनास आले की तुकाराम मुंडे साहेबांनी मोक्कांतर्गत कारवाई सारख्या कारवाईचे आदेश दिले असताना देखील खुलेआम पणे मावा व गुटख्याची विक्री केली जात आहे त्या अनुषंगाने माय मराठी टीव्ही च्या टीमने पुराव्यानिशी सर्व चित्रीकरण करून , याविषयी माय मराठी टीव्ही च्या माध्यमातून वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते 

या व्रतामध्ये सध्या सुरू असलेले परिस्थितीचे पुरावे देखील दाखवण्यात आले होते त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सातारा कार्यालयाचे अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान समीर हवालदार यांनी जून महिन्यामध्ये कराड मधील एका प्रसिद्ध मावा विक्रेत्यावरती कारवाई केली होती

त्यानंतर काही काळ उलटताच कराड शहरामध्ये पुन्हा मावा विक्री गुटखा विक्री सुरू झाली परंतु त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला होता तो बदल म्हणजे दुकाने बंद ठेवायची आणि दुकानाबाहेर बसून मावा गुटखा विक्री करायची अर्थातच मावा विक्रेत्यांनी थेट घरामध्येच मावा बनवण्याचे कामकाज सुरू केले होते त्यानंतर तयार केलेल्या मावा पॅकेट मध्ये पॅकेजिंग करून आपल्या बंद असलेल्या टपरीच्या बाहेर आपल्या बंद असलेल्या दुकान गाळ्याच्या बाहेर तसेच दुचाकीच्या गाडीच्या डिक्की मध्ये ठेवून चौका चौकामध्ये विक्री करण्यास सुरू केली होते 

याचे देखील वृत्त पुराव्यानिशी माय मराठी टीव्ही ने दिनांक 27 जुलै रोजी व 30 जुलै रोजी सद्यस्थितीच्या पुराव्यानीशी प्रसिद्ध केले होते 

त्यानंतर दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सातारा कार्यालयाचे अन्नसुरक्षा अधिकारी श्री इमरान शमीर हवलदार यांनी मुजावर कॉलनी शांतीनगर कराड या ठिकाणी छापा टाकला असता आरोपीत इसम नामे साहिल मस्जिद शेख वय वर्ष 26 राहणार शांतीनगर मुजावर कॉलनी कराड हा घरामध्ये मावा बनवताना आढळून आला , त्या ठिकाणचा मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीत साहिल मज्जिद शेख यास कराड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले व त्या ठिकाणी कराड शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 977/2026 भा.न्या.सं.2023 चे कलम 223 व तसेच कलम 274, 275, 123, अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 कलम 26(2)(i), 26(2)(iv), सहवाचन कलम 27 (3) (e) व कलम 30 (2) (a) सहवाचन अन्न सुरक्षा व मानदे (प्रोहिबीशन & रीस्ट्रीक्शन्स ऑन सेल) 2011 चे नियमावली 3.1.7 व कलम 59 अन्वये आरोपीत नामे साहिल मज्जिद शेख याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पुढील कार्यवाही सुरू आहे….

सदरच्या कारवाईनंतर शहरासह तालुक्यामध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने केलेली कारवाई कौतुकास्पद आहे व प्रशासनीय आहे परंतु प्रत्येक वेळेला अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने फक्त एका मावा विक्रेत्यावरती कारवाई करण्यात येते परंतु कराड शहराची परिस्थिती पाहिली तर शहरांमध्ये किमान 25 हून अधिक मावा विक्रेते आहेत तर ढीगभर गुटखा विक्रेते आहेत मग अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने एकावर ती कारवाई झाल्यानंतर इतरांची मात्र चलती होते इतर मावा गुटखा विक्रेते अगदी जोमाने आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवतात.. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मनुष्यबळासाठी वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन सरसकट कारवाई करून मावा व गुटखा विक्रेत्यांचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!