प्रियदर्शनी विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 18 8 2026 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे
कराड

प्रियदर्शनी विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 18 8 2026 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे
प्रियदर्शनी विविध कार्यकारी सह. सेवा सोसायटी लि; कराड.
ता. कराड, जि. सातारा
वार्षिक सर्वसाधारण सभेची
(फक्त सभासदांकरिता)
सर्व सभासदांना कळविण्यात येते की,
प्रियदर्शनी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. कराड ता. कराड, या संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि.१८-०८-२०२६ रोजी सकाळी ११.३५ वाजता. चेअरमन सॊ यांचे अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खालील विषयांचा विचार विनिमय करणेसाठी होणार आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर हजर रहावे, ही नम्र विनंती.
* सभेपुढील विषय *
१) सभेचे नोटीस वाचन करणे.
२) मागील दिनांक १९-०८-२०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करणे.
३) दिनांक ३१/०३/२०२६ अखेरची आर्थिक पत्रके तेरीज, ताळेबंद, नफा-तोटा पत्रके वाचून मंजूर करणे.
४) सन २०२६-२०२७ सालाचे अंदाजपत्रक मंजूर करणे व मागील सालाच्या बजेटपेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे.
५) सन २०२७-२०२८ अहवाल सालाकरिता बाहेरील कर्ज उभारणीचे बाबतचे अधिकार मा. संचालक मंडळास मान्यता देणे.
६) सन २०२५-२०२६ चे लेखापरिक्षण अहवाल वाचून मंजूरी देणे व दोष दुरूस्ती अहवालास मंजूरी देणे.
७) सन २०२६-२०२७ वर्षासाठी लेखापरिक्षकाची नेमणूक करणे व मेहनताना ठरविणे.
८) संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा विभागणीस मंजूरी देणे.
९) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७२ (२) संचालक व त्याचे नातेवाईक यांचे कर्जाचा आढावा घेणेबाबत.
१०) मयत सभासदांच्या वारस नोंदीचे अधिकार संचालक मंडळास देणे.
११) मा. अध्यक्षसोो यांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.
आभार व समारोप
येणेप्रमाणे सभेत कामकाज होईल.
कळावे
दि.०१-०८-२०२६
संचालक मंडळाचे आदेशावरून
प्रियदर्शनी विविध कार्यकारी सह. सेवा सोसायटी लि. कराड.
टिप:
१) कोरम अभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी त्याच ठिकाणी १ तासानंतर सभा घेतली जाईल व त्यास कोरमची आवश्यकता नाही.
२) सभासदांना काही माहिती अगर प्रश्न विचारावयाचे असतील तर दि. १३-०८-२०२६ पूर्वी संस्थेकडे त्यांनी लेखी कळवावे.
३) विशेष सूचना: संस्थेची निवडणूक झाल्यापासून पुढील निवडणूक होईपर्यंत प्रत्येक सभासदाचे ५ वर्षात किमान एक वेळ बार्षिक सर्वसाधारण सभेस हजर असणे आवश्यक आहे अन्यथा आपण पुढील निवडणुकीस मतदार म्हणून अपात्र असाल याची नोंद घ्यावी.





