E-Paper

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मातोश्री महिला नागरिक सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ

कराड

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मातोश्री महिला नागरिक सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ

कराड : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मातोश्री ग्रुप, कराडच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मातोश्री महिला नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित, कराडचा शुभारंभ उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, बचतीची सवय वाढविणे, महिलांना स्वयंरोजगार व उद्योगासाठी आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देणे तसेच सर्वसामान्य नागरिकांना विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या पतसंस्थेची सुरुवात करण्यात आली आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ

शुभारंभ प्रसंगी कराड नगरीच्या लोकप्रिय नगरसेविका व आरोग्य सभापती सौ. अरुणा सुरेश नाना पाटील, लोकप्रिय नगरसेविका सौ. शारदा रमेश माने (माई), माजी नगरसेविका सौ. लीना सिद्धार्थ थोरवडे, वारंजीचे युवा उद्योजक माननीय प्रमोद पाटील, प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर दाऊदभाई आंबेकरी, श्री. जलालुद्दीन पालकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मातोश्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक नवाज बाबा सुतार यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री ग्रुपच्या विविध सामाजिक व व्यावसायिक उपक्रमांचा विस्तार होत असून, महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने या पतसंस्थेची सुरुवात करण्यात आली आहे.

मातोश्री महिला नागरिक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ. मिनाज नवाज बाबा सुतार व व्हाईस चेअरमन सौ. संगीता धीरजसिंह जाधव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या आगामी कार्याची माहिती दिली तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा सांभाळली.

संस्थेच्या संचालिका सौ. निलोफर शेख, सौ. रईसा अत्तार, डॉ. ताहिरा शेख, सौ. सुमया नदाफ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

राहत फाउंडेशनचे रियाजभाई अत्तार, अर्बन बँकेचे श्री. संदीपदादा पवार, युवा नेते मुसदीक आंबेकरी, गोटे ग्रामपंचायत सदस्य अॅड. साबीर मुल्ला, वारंजी गावाचे उद्योजक प्रफुल पाटील, युवा उद्योजक शिवराज माने, युवा नेते साबीरमिया मुल्ला, मोहसीनभाई कागदी, शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष इरफानभाई सातारकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे, डॉ. आलम शेख, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरजसिंह जाधव, अनिसभाई मलबारी, इस्माईल पालकर, यासीन अत्तार, इमरान मुजावर, प्रेरणा भोसले आणि सौ. सुवर्णा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच शहानवाज सुतार, चांदसाहेब निशाणदार, तोफिक मोमीन यांच्यासह मातोश्री ग्रुपचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य

मातोश्री ग्रुपच्या विविध सामाजिक व व्यावसायिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले जात आहे. मातोश्री मल्टी स्पेशालिस्ट क्लिनिक, मातोश्री मल्टी स्पेशालिस्ट डेंटल अँड इम्प्लांट सेंटर, मातोश्री मॅनपॉवर सप्लाय, मातोश्री फाउंडेशन तसेच विविध सामाजिक उपक्रमांनंतर आता महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने मातोश्री महिला नागरिक सहकारी पतसंस्थेची भर पडली आहे.

मातोश्री ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचा विस्तार करताना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, बचत व आर्थिक नियोजनाला प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगार व उद्योगासाठी आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देणे, तसेच गरजू महिला व नागरिकांना आर्थिक मदतीचे माध्यम उपलब्ध करून देणे हा या संस्थेच्या कार्यामागील प्रमुख उद्देश आहे.

यावेळी मातोश्री ग्रुपच्या विविध विभागातील कर्मचारी, डॉक्टर, पदाधिकारी, सभासद आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. डॉ. अभिजीत सुपेकर, डॉ. अश्विनी सुपेकर, डॉ. ऋतुजा थोरात, डॉ. सोनाली देसाई, डॉ. जास्मिन इनामदार, सोलिया सय्यद, जिया जमादार, अशपाक सुतार, लियाकत पालकर तसेच मातोश्री ग्रुपचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा देणारी आणि बचत, कर्जसुविधा व आर्थिक प्रगतीच्या माध्यमातून महिलांच्या हातात आर्थिक बळ देणारी संस्था म्हणून मातोश्री महिला नागरिक सहकारी पतसंस्था आगामी काळात कार्य करेल, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक नवाज बाबा सुतार, चेअरमन सौ. मिनाज नवाज बाबा सुतार व व्हाईस चेअरमन सौ. संगीता धीरजसिंह जाधव यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी झालेला हा शुभारंभ म्हणजे मातोश्री ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीतून महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!