उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या भेटी नंतर रुग्णालय प्रशासन ॲक्शन मोड वर
उपजिल्हा रुग्णालय कराड

उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या भेटी नंतर रुग्णालय प्रशासन ॲक्शन मोड वर
कराड प्रतिनिधी — याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी गेल्या चार दिवसांपूर्वी कराडच्या स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला अचानक पणे भेट देऊन रुग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती घेतली त्या अनुषंगाने आज दिनांक ७ डिसेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ.भगवान पवार व सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांनी कराड येथे येऊन संपूर्ण कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सौ सुनिला लाळे यांनी डॉ. भगवान पवार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांचे स्वागत केले.
पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ भगवान पवार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांनी संपूर्ण रुग्णालयाच्या वार्ड मध्ये भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. काही तांत्रिक अडचणींमुळे काही सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्या सुविधा सुध्दा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल असे उपसंचालक डॉ भगवान पवार यांच्या कडून व्यक्त केले जात आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेबाबत उपसंचालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या दरम्यान भिमशक्ति सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी व बहुजन समाज पार्टी चे माजी शहराध्यक्ष किरण थोरवडे यांनी ही उपसंचालक यांना रुग्णालयातील सुविधा बाबत चर्चा केली.





