E-Paper

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आ. डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते संपन्न 

रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मिळालेल्या नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आ. डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते संपन्न 

कराड प्रतिनिधी :-  या बाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयास सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन रुग्णवाहिका देण्यात आली त्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उपजिल्हा रुग्णालय येथे कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ.श्री. अतुलबाबा भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सौ.सुनिला लाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलताना आमदार डॉ.अतुलबाबा भोसले म्हणाले की, राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. कराड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केला जात आहे. 

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाला नवीन रुग्णवाहिका देण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला आहे. या रुग्णवाहिकेचा जास्तीत जास्त फायदा हा प्रसूतीनंतर महिलांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी होणार असून त्याचा लाभ हा खेड्यापाड्यातील महिलांना होणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी उपजिल्हा रुग्णालयास मिळालेल्या नवीन रुग्णवाहिके बद्दल आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार मानले. 

उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौ.सुनिला लाळे यांनी रुग्णालयाच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानले. या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा 👇👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!