E-Paper

सातारा जिल्हा रुग्णालयास वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर 

२२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे होणार महाआरोग्य सन्मान सोहळा 

सातारा जिल्हा रुग्णालयास वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर 

२२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे होणार महाआरोग्य सन्मान सोहळा

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ४ फेब्रुवारी २०२५ पासून राबविण्यात आलेल्या कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिम व दोन कोटी महिलांचे तपासणी मोहीम अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती सहसंचालक ( असंसर्गजन्य रोग ) आरोग्य सेवा, मुंबई डॉ.उमेश शिरोडकर यांनी दिली.

२२ फेब्रुवारी २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे हा महाआरोग्य सन्मान सोहळा पार पडणार आहे. या मध्ये सातारा,पालघर,व सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागास हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!