कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची गांजा विक्रीकरीता आणलेल्या दोन इसमाविरुध्द कारवाई
कराड

कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची गांजा विक्रीकरीता आणलेल्या दोन इसमाविरुध्द कारवाई
मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरुध्द प्रभावी मोहिम राबवुन जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे अनुषंगाने ठोस पावले उचललेली आहेत.
दि.१६/०३/२०२६ रोजी सायंकाळी मा. राजश्री पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग यांना इसम नामे सोन्या ऊर्फ शुभम दिलीप पवार रा. बुधवारेपठ व इसम नामे जगन्नाथ महिपती भोसले रा. बुधवारपेठ कराड हे बुधवारपेठ येथे एका इमारतीमध्ये बेकायदा बिगर परवाना गांजा विक्री करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली असुन, सदर ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तसेच कराड शहर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांना सापळा रचुन कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्याप्रमाणे कराड शहर पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय गोडसे यांनी बुधवारपेठ याठिकाणी सापळा रचुन छापा कारवाई केली असता, इसम नामे सोन्या ऊर्फ शुभम दिलीप पवार रा. बुधवारेपठ व इसम नामे जगन्नाथ महिपती भोसले रा. बुधवारपेठ कराड यांचे कब्जात ५८,७००/- रुपये किंमतीचा २ किलो ३३६ ग्रॅम वजनाचा अवैध असलेला कॅनाबीस (गांजा) असा मुददेमाल सापडला.
चौकशीमध्ये सदरचा मुददेमाल कराड शहर व परिसरामध्ये विक्री करण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपींविरुध्द कराड शहर पोलीस ठाणेस अंमली औषधीद्रव्ये व मनप्रभावी अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई ही मा. राजश्री पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी कराड उप-विभाग व श्री. दत्तात्रय दराडे पोलीस निरीक्षक, कराड शहर पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक श्री. निखिल मगदुम, पोलीस अंमलदार श्री. संताजी जाधव, असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, मयुर देशमुख, अनिकेत पवार, दिग्विजय सांडगे, यांनी केलेली असुन, मा. पोलीस अधीक्षक, श्री. तुषार दोशी व मा. अपर पोलीस अधीक्षक, डॉ. श्रीमती वैशाली कडुकर यांनी सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.





