E-Paper

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी शिवाजी भोसले बोलतोय व अंध गायकांनी गायलेल्या भीम गितांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी शिवाजी भोसले बोलतोय व अंध गायकांनी गायलेल्या भीम गितांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, कराड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय व दूष्टीहिन असलेल्या अंध गायकांच्या गायनाने रसिक प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन गेले. 

जयंती उत्सव कमेटीच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून विविध कार्यक्रम आयोजित केले होते आणि आज चौथ्या दिवशी मा. प्रदीप बनसोडे यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यातून त्यांनी शिवा काशिद यांचा जीवनपट पटच आपल्या वाणीतून प्रकट केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत त्यांचे विचार पिठावर आगमन होताच त्यांच्या अंगावरती पुष्पवृष्टी करण्यात आली. व मावळ्यांनी त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी दूष्टीहिन असलेल्या अंध गायकांनी भिम गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून भिम गीताचा सुरू करण्यात आला. 

प्रदीप बनसोडे यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे सादरीकरण करत असताना त्यांनी मी छत्रपती शिवाजी महाराज नसून मी त्यांचा मावळा आहे आणि मी शिवा काशिद आहे. स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ज्या काही लढाई केल्या त्याचा मी स्वतः साक्षीदार असुन जर स्वराज्य निर्माण करायचे असेल तर इथल्या तरुणांना शिवाजी व्हावे लागेल. असेही त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

यावेळी अंध गायकांनी गायलेल्या भीम गितांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध होऊन उपस्थितांच्यात चैतन्य निर्माण केले

काहींनी तर फरमाईश करून पुन्हा ते गाणं म्हणण्यासाठी अंध गायकांना गाणं म्हणण्यासाठी भाग पाडले. शेवटी व्हिआयपी राहणं,व्हिआयपी खाणं,व्हिआयपी मान सन्मान, बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं या गाण्यावर शेवट करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी अंध कलाकार यांचे व प्रदीप बनसोडे यांचे स्वागत जयंती उत्सव कमेटीच्या वतीने करण्यात आले. व शेवटी आप्पासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!