कराड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अलोट भिमसागर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

कराड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अलोट भिमसागर
कराड प्रतिनिधी — भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ जयंती निमित्त जयंती उत्सव कमेटीच्या वतीने दिनांक ९ एप्रिल पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. १४ एप्रिल च्या पूर्व संध्येला कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रात्री १२ वाजता अलोट भिमसागर जमला होता.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले व कमेटीचे उपाध्यक्ष सुदेश थोरवडे यांच्या सह सर्व पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ अतुलबाबा भोसले, कराड नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. राजेंद्रसिंह यादव,व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, लोकशाही आघाडीचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदयसिंह पाटील,आजी माजी नगरसेवक, महसूल प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी श्री.अतुल म्हेत्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दत्तात्रय दराडे व इतर पक्ष संघटनाचे पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी हजारो भिमसैनिकांह महिला भिमसैनिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. डॉ आंबेडकर चौक परिसरात सुशोभीकरण करण्यात आले होते. आकर्षक सजावट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. फटाक्यांची आतिषबाजीने तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
कार्यक्रमाची सुरुवात बुध्द वंदनेन झाली. तर भजन गायनाने सांगता करण्यात आली.
व्हिडिओ पाहण्यासाठी 👇👇 येथे क्लिक करा




