E-Paper

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डान्स शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद —

महिलांची लक्षणीय उपस्थिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डान्स शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद — महिलांची लक्षणीय उपस्थिती — पाचशे ते पाच हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम मनोज जाधव मित्र परिवाराच्या वतीने स्पर्धेकांना वितरित 

कराड प्रतिनिधी —  याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक ९ एप्रिलपासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे जयंती उत्सव कमेटीने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची सांगता १५ एप्रिल रोजी डान्स शो च्या कार्यक्रमाने झाली.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीने जयंती उत्सवाची सुरुवात स्वच्छता अभियान, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबीर, महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, मॅरेथॉन स्पर्धा, आरोग्य शिबीर, अंधश्रध्दा निर्मूलन, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, चित्तथरारक दांडपट्टा, आकर्षक सजावट व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून याची सांगता डान्स शो च्या कार्यक्रमाने करण्यात आली.

   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले व उपाध्यक्ष सुदेश थोरवडे व कमेटीचे पदाधिकारी यांनी अभिवादन करून डान्स शो ला सुरुवात करण्यात आली. या डान्स शो ला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रत्येक स्पर्धेकाला मनोज जाधव मित्र परिवाराच्या वतीने पाचशे,एक हजार ते पाच हजार रुपये रोख बक्षीस म्हणून देण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गाण्यावर हा डान्स शो ठेवण्यात आला होता. याला नागरिकांनी सुद्धा भरभरून दाद दिली.

जयंती उत्सव कमेटीने भव्य रिल्स स्पर्धा हि kameti1414 या इंस्टॉग्राम पेजला कोलब केली होती. त्याचा हि बक्षिस वितरण समारंभ या डान्स शो दरम्यान घेण्यात आला. या साठी प्रथम बक्षीस सागर कांबळे यांच्या वतीने तीन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस जयंती उत्सव कमेटीच्या वतीने दोन हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह तर तिसरा क्रमांक आलेल्या विजेत्याला प्रवर्तन थोरवडे यांच्या वतीने एक हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

यावेळी जयंती मिरवणुकीत सहभागी चित्ररथ मंगळवार पेठेतील भिमरत्न मंडळ व बौद्ध लेणी संवर्धन परिषद कराड आणि दरवर्षी मिरवणूक दरम्यान बुधवार पेठेतील संभाजी सुर्यवंशी मित्र परिवार यांच्या वतीने भिम अनुयायी यांना भोजनाची सोय केली जाते. त्यामुळे संभाजी सुर्यवंशी यांचाही सत्कार करण्यात आला.

तसेच जयंती उत्सवाचे वार्तांकन करणारे माय मराठी टीव्ही न्यूज चॅनेलचे संपादक शरीफ तांबोळी व सहसंपादक मुस्कान तांबोळी यांचे प्रतिनिधी किरण थोरवडे यांचाही सत्कार करण्यात आला.

परफेक्ट ब्युटी पार्लर यांच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आला त्यामध्ये दोन महिलांना पैठणी साड्या देण्यात आल्या. तर दोन महिलांना बहुजन समाज पार्टी चे माजी सातारा जिल्हा उपाध्यक्ष सतीश रणशिंगारे व किरण थोरवडे यांच्या वतीने प्रत्येकी पाचशे रुपये रोख देण्यात आले. शेवटी जयंती उत्सव कमेटीच्या वतीने संतोष थोरवडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!