
दलित महासंघाने आयोजित केलेल्या प्रबोधन मेळाव्यात श्रीनिवास जोशी यांचा सत्कार
सातारा प्रतिनिधी — महाराष्ट्र राज्य दलित महासंघाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथे आयोजित केलेल्या प्रबोधन मेळाव्यात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्रामीण रुग्णालय,काशिळ येथील सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक श्री. श्रीनिवास जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दलित महासंघाचे अध्यक्ष मा. उमेश चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ रमाकांत साठे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर गालफाडे, अण्णाभाऊ साठे कूती समितीच्या सचिव सौ.मनिषा चव्हाण, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप माने,निलेश लोंढे, महेश वायदंडे,पुजाताई घाडगे, विमलताई शिंदे,व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.
सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला.




