परिचारिका दिनानिमित्त मोफत दंत चिकित्सा शिबीर आयोजित करण्याचा मानस — डॉ.स्नेहल जाधव
मोफत दंत चिकित्सा

परिचारिका दिनानिमित्त मोफत दंत चिकित्सा शिबीर आयोजित करण्याचा मानस — डॉ.स्नेहल जाधव
कराड प्रतिनिधी — मंगळवार दिनांक १२ मे रोजी परिचारिका दिवस असून या दिवशी सर्व परिचारिका व इतर नागरिकांची दात तपासणी मोफत करण्याचा निर्णय कराड येथील कराड नर्सिंग होम येथे कार्यरत असलेल्या डॉ. स्नेहल जाधव मॅडम यांनी माय मराठी टीव्ही न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली .
डॉ. जाधव यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, परिचारिका हा दिवस निमित्त मात्र आहे परंतु आपण सामाजिक भावनेतून आपले काम केले पाहिजे म्हणून दंत चिकित्सा हा फक्त दात तपासणीचा विषय नसून तो कशा पद्धतीने माणसाला गिळंकृत करू शकतो याची माहिती देणंही तितकच गरजेचे आहे. म्हणून मी परिचारिका दिनानिमित्त मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्याचा माझा मानस आहे.तरी कराड शहरातील व उपनगरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी माय मराठी टीव्ही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना केले !




