E-Paper

कराड येथील पँथर हरपला,दिवंगत प्रमोद जगन्नाथ थोरवडे मागे राहिल्या फक्त आठवणी..

कराड

कराड येथील पँथर हरपला,दिवंगत प्रमोद जगन्नाथ थोरवडे मागे राहिल्या फक्त आठवणी..

१९८५ — ८६ चे साल असेल आम्ही त्यावेळी बालवाडी ते पहिली ते चौथीच्या वर्गात जाण्याचं वय. आम्ही लहान असताना आमचे चुलत चुलते जगन्नाथ भाऊ घरात लाईट नाही अंधार असलेल्या घरात त्यांची बायको म्हणजे माझी चुलती अनुसया आणि त्यांची पाच मुलं आणि एक मुलगी असा त्यांचा एकत्रित परिवार होता. आम्हाला जस जसं कळत होतं तसं आमचे भाऊ हे लाकुड तोडून रात्री उशिरा घरी यायचे आणि बायको सोबत भांडण करायचे. आम्ही त्या वेळी लहान असल्यामुळे आम्ही बघ्याची भूमिका घैयचो. पण नित्याचचं होतं. आमच्या घराची भिंत आणि त्यांच्या घराची भिंत एकच असल्याने आम्हालाही त्यांच्या आवाजाची भिती वाटायची. रोजच असा वाद भांडणं असायची त्यांची मुलं त्यावेळी मोठी होती. थोरला मुलगा म्हणजेच पँथर ते आणि त्यांचा दुसरा मुलगा विजय हे दोघेही कुशल फर्निचरचे कामे करायची या दोघां बंधूंनी किती तरी पोरांना फर्निचर कामात मिस्त्री बनवायचे काम केले.त्यांचा भाऊ भिमराव हा मुंबई येथे राजावाडी रुग्णालयात कामाला लागला तर दुसरा मुलगा हा आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षण घेऊन त्याने किती तरी पदके मिळवली आणि सर्वात धाकटा हा मिळेल ती कामं करुन आपली उपजीविका सांभाळत आहे. लाडकी बहिण ही तिला बेबी म्हणायचो तीच बेबी वाळवा तालुक्यातील साखराळे या गावी लग्न करून दिल्याने ती त्या गावातील सरपंच म्हणूनही तीने नाव लौकीक केले. तिचे पती म्हणजे आमचे भाऊजी यांनी सुद्धा तिला कधीही माहेरची ओढ भासू दिली नाही. इतका मोठा परिवार असताना सुद्धा आमच्या दादांच्या जीवावर हे कुटुंब अवलंबून होतं. पण नियतीच्या मनात काय असेल हे कोणालाही सांगता येत नाही. त्याची प्रचीती गेल्या सहा सात वर्षांपासून हा आमचा दादा अंथरूणावर पडून होता. त्यांची पत्नी शोभा वहिनी आणि त्यांची दोन्ही मुलं आणि मुली काळजी घेत होती. पण मंगळवारी दिनांक १९ मे रोजी दुपारच्या तीन सव्वा तीन च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आणि आमचा दादा म्हणजेच पँथर हा काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या आठवणी खूप काही आहेत पण त्या शब्दात मांडण्यासारख्या नाहीत. म्हणून उद्या त्यांच्या पुण्यानुमोदन व जलदान विधी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना त्यांचा लहान भाऊ बाल पँथर म्हणून त्यांना आदरपूर्वक आदरांजली अर्पण करतो. जय भीम, जर संविधान, 

आपला धाकटा बंधू 

बाल पँथर किरण थोरवडे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!